BREAKING NEWS

Wednesday, June 8, 2016

जिल्हा परीषद समोर आपल्या आई सोबत उपोषण करणाऱ्या शिक्षकाच्या आईचा उपोषण मंडपातच मृत्यू,

रंगया रेपाकवार / गडचिरोली /--

गेल्या दहा वर्षापासून जिल्ह्याच्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात कंत्राटी शिक्षक म्हणून काम करणाऱ्या शिक्षकाला आपल्या आजाराच्या उपचारासाठी  तालुका मुख्यालयात बदली करण्याच्या   अनेकदा विनंती करून सुद्धा पुन्हा त्यांची बदली अतिदुर्गम भागात करण्यात आली.म्हणून जी प समोर आपल्या आई सोबत उपोषण करणाऱ्या शिक्षकाच्या आईचा उपोषण मंडपातच मृत्यू झाल्याने खळबळ माजली आहे. प्रभाकर गेडाम गेल्या दहा वर्षापासून जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या आणि नक्षलग्रस्त भागात सिरोंचा केंद्रात जिल्हा परिषदेच्या शाळेत सर्व शिक्षा अभियांतर्गत विषय तज्ञ म्हणून कंत्राटी शिक्षकाच काम करीत होते.या दुर्गम भागात काम करताना प्रभाकर यांना मिरगी (फिट) ची बिमारी झाली या बिमारीमुळे प्रभाकर अनेकदा चक्कर येऊन खाली कोसळले.या दुर्गम भागात बिमारीचा उपचार होत नसल्याने प्रभाकरने जिल्ह्य परिषदला अनेकदा विनंती अर्ज सादर केले. मात्र जिल्हा परिषदेने या अर्जाचे दखल न घेतल्याने तीन-चारदा प्रभाकर आपल्या वृद्ध आई सोबत जिल्हा परिषदे समोर उपोषण केले.  गेल्या १५ दिवसापूर्वी प्रभाकर यांची बदली सिरोंचा येथून अति दुर्गम कोरची तालुक्यात करण्यात आली.कोरची हा क्षेत्र दुर्गम आणि नक्षलग्रस्त असल्याने येथेही प्रभाकर यांना उपचार मिळू शकत नव्हत त्यामुळे ६ जून ला प्रभाकर पुन्हा आपल्या वृद्ध आईसह गडचिरोलीच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषणावर बसला.मात्र जिल्हा परिषदेचे एकही अधिकारी या उपोषण मंडपाला भेट दिली नाही.बुधवारी पाहटे अचानक प्रभाकरची आई वच्छालाबाई यांचा मृत्यू झाला.आणि प्रभाकर मंडपात गंभीर अवस्थेत पडून होता.घटनेची माहिती मिळताच पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेतली  घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रभाकर यांना गडचिरोलीच्या सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.आई मृतक आईवर  शवविच्छेदन करण्यात आले.वच्छालाबाई यांचा मृत्यू करंट लागल्याने झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी लावला आहे. 
 गेल्या दहा वर्षापासून दुर्गम भागात काम करणाऱ्या शिक्षकाला आपल्या बदलीसाठी अनेकदा निवेदन देऊन सुद्धा जिल्हा परिषद प्रशासनाने वारंवार दुर्लक्ष केले.त्यामुळे प्रभाकराच्या आईचा बळी गेला आहे.या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी तसेच उपोषण स्थळी एकही पोलीस तैनात करण्यात आला नव्हता त्यामुळे याची चौकशी करावी असी मागणी शिवसेना आणि प्रभाकर यांचे भाऊ केले आहे 

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.