BREAKING NEWS

Wednesday, June 1, 2016

तुळशी वृंदावन व वन उद्यानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ


पंढरपूर, /--   

 


पंढरपूर येथे यमाई तलाव परिसरात वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शना खाली तुळशी वृंदावन व वन उद्यान विकसित करण्यात येत आहे. या तुळशी वृंदावन व वनउद्यानाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन तुळशी वृक्षाची लागवड करुन या प्रकल्पाचा शुभारंभ केला.
यावेळी  मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये नवीन पुल विष्णूपद बंधारा,जल शुध्दीकरण केंद्र, अग्निशनम दल अधिकारी व कर्मचारी निवासस्थान व वाहनतळ, अधिकारी –कर्मचारी  निवास्थान व रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात आले
यावेळी मुख्यमंत्री महोदयांसमवेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच सहकार मंत्री चंद्रकात पाटील, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पालकमंत्री विजय देशमुख, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे,  विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम्, जिल्हाधिकारी रणजित कुमार, आमदार भारत भालके, आमदार प्रशांत परिचारक, नगराध्यक्षा साधना भोसले यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, अधिकारी व मान्यवर नागरीक उपस्थित होते.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.