BREAKING NEWS

Saturday, October 1, 2016

गांधीजींमुळेच देशात हिरवा आतंकवाद पसरला ! - अजयसिंह सेंगर, राष्ट्रीय अध्यक्ष, महाराणा प्रताप बटालियन



डावीकडून श्री. प्रियेश जयस्वाल, अधिवक्ता ईश्‍वरप्रसाद
खंडेलवाल, (बोलतांना) श्री. अजयसिंह सेंगर
आणि श्री. संभाजी कावीर
    मुंबई- - देशाच्या फाळणीच्या वेळी पाकिस्तान मुसलमानांना देण्यात आला. त्या वेळी केवळ गांधीजींमुळेच मुसलमान भारतात राहिले. त्याच्या परिणामस्वरूप आज देशात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या जातात. आतंकवादी कारवाया होत आहेत. गांधीजींमुळेच देशात हिरवा आतंकवाद पसरला, असे प्रतिपादन महाराणा प्रताप बटालियनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अजयसिंह सेंगर यांनी केले. भारत शासनाच्या वतीने साजरा करण्यात येणारा २ ऑक्टोबर हा दिवस गांधी जयंती म्हणून साजरा केला जातो. हा दिवस काळा दिवस म्हणून पाळला जावा. महाराणा प्रताप बटालियनच्या वतीने २ ऑक्टोबर या दिवशी काळा दिवस पाळून पनवेल येथील पृथ्वी हॉलमध्ये सकाळी ८ वाजता निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. याची माहिती देण्यासाठी महाराजा प्रताप बटालियनच्या वतीने ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या वेळी व्यासपिठावर लष्कर-ए-हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल, हिंदू राष्ट्रसेनेचे श्री. प्रियेश जयस्वाल, धर्माभिमानी श्री. संभाजी कावीर उपस्थित होते.
      या वेळी श्री. अजयसिंह सेंगर म्हणाले, गांधीजींमुळे देशाचे तुकडे पडले. फाळणीच्या वेळी पाकिस्तानमधून भारतात येणार्‍या २७ लक्ष हिंदूंची निर्दयपणे हत्या करण्यात आली. या हत्येला गांधी उत्तरदायी आहेत. नथुराम गोडसे यांनी राष्ट्रहितासाठीच गांधींची हत्या केली. गांधी देशाचे राष्ट्रपिता नाहीत. त्यांना राष्ट्रपिता ही उपाधी कुणीही दिलेली नाही. स्वत: शासनाकडून गांधीजींना ना राष्ट्रपिता ही पदवी देण्यात आली आहे, ना कोणते पदक देण्यात आलेले आहे. त्यामुळे देशातील सर्व गांधींचे पुतळे हटवण्यात यावेत.
राष्ट्रहितासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक ! - ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल
      कोणत्याही व्यक्तीला भारतमातेच्या पतीचा दर्जा दिला जाऊ शकत नाही. गांधींची हत्या करणार्‍या नथुराम गोडसे यांना अपराधी ठरवून गांधींचे उदात्तीकरण करण्यात आले. नथुराम गोडसे यांनी राष्ट्राच्या हितासाठीच गांधींची हत्या केली. गांधीजींनी देशाला नपुंसक बनवले. भारतीय समाजाला गांधीजी नव्हेत, तर नथुराम गोडसे पूजनीय आहेत. देशाला नपुंसक बनवणारा नव्हे, तर तेजस्वी इतिहास शिकवायला हवा. जोपर्यंत हिंदु राष्ट्राची स्थापना होत नाही, तोपर्यंत देशाला तेजस्विता येणार नाही. राष्ट्रहितासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक आहे.
...अन्यथा देशात बाबर आणि लादेन वाढतील ! - प्रियेश जयस्वाल
    स्वत: प्रभु श्रीराम यांनी या भूमीला जननी मानले. देशाची सेवा करणारा प्रत्येक नागरिक या भूमीला मातृभूमी मानतो. असे असतांना गांधींना राष्ट्रपिता असे का संबोधले जाते. देशाला नथुराम गोडसे यांच्यासारखी राष्ट्रभक्ती आवश्यक आहे. अशा प्रकारे राष्ट्रभक्ती जागृत ठेवली नाही, तर देशात बाबर आणि लादेन वाढतील.

Share this:

1 comment :

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.