चांदूर रेल्वे / शहेजाद खान /---

चांदूर रेल्वे तहसीलदार म्हणून श्री बी.ए.राजगडकर यांनी मंगळवारी (ता.३१) सकाळी १० वाजता तहसीलदार पदाचा पदभार स्विकारला.
चांदूर रेल्वे तहसीलदार जनाब इकबाल अहमद मार्च महिण्यात सेवानिवृत्त झाले.तेव्हापासून चांदूर रेल्वे तहसीलदार पद रिक्त होते. या पदाचा कार्यभार नायब तहसीलदारश्री दिनेश बढीये पाहत होते. नायब तहसीलदार श्री बी.ए.राजगडकर यांना सेवाजेष्ठतेनुसार बढती होऊन चांदूर रेल्वे तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली. तहसीलदार राजगडकर यांचे नायब तहसीलदार दिनेश बढीये व सर्व कर्मचाNयांनी पुष्पगुच्छ देवून जोरदार स्वागत केले.
तहसीलदार श्री राजगडकर यांनी २००८ ते २०११ नायब तहसीलदार म्हणून विभागीय आयुक्त कार्यालयात काम केले. २०११ ते २०१४ काळात चांदूर रेल्वे तहसील कार्यालयात निरीक्षण अधिकारी म्हणून काम केले. २०१४ ते १६ अमरावती तहसील कार्यालयात निवडणूक नायब तहसीलदार म्हणून काम केले. तहसीलदार राजगडकर यांना विविध पदावर प्रदिर्घ कामाचा अनुभव आहे.
Post a Comment