अनिल चौधरी ,
पुणे ,
(अमोल मराठे यांसकडून )
भगवे वादळ या व्हाटस अप ग्रुप चा 2रा वर्धापन दिन मोठ्या उत्सहात व दिमाखदार साजरा करण्यात आला . यावेळी नवविवाहाईत जोडप्यांचा तसेच ठाणे , मुंबई येथील शिवसैनिक आणि पत्रकारांचा यावेळी सत्कार करण्यात आला .
याप्रसंगी अधिक माहिती देताना भगवे वादळ चे आयोजक विजय जाधव म्हणाले , दरवर्षी भगवे वादळ समाजातील उत्कृष्ट कार्य करणारे समाजसेवक , नगरसेवक , डॉक्टर ,वकील ,शिवसैनिक तसेच पत्रकारांचा सत्कार करण्यात येतो. आयोजनाचे हे दुसरे वर्षे असून समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा योग्य सन्मान आम्ही करत असतो .
यावेळी नवविवाहाईत जोडप्यांचा देखील सन्मान करुण त्यांच्या पुढील वैवाहिक जीवनास शुभेच्छ्या देण्यात आला . याप्रसंगी महाडचे मा.उपनगराध्यक्ष नितीन पावले , शहर प्रमुख दीपक सावंत , मुंबईचे नगरसेवक संजय पवार , महाडचे सहसंपर्क प्रमुख प्रमोद गोगावले , नगरसेवक नितीन आर्ते , उपतालुका प्रमुख सुनील देशमुख ,युवा प्रमुख समीर रेवाळे अरविंद मालुसरे , पत्रकार संरक्षण समिती चे प्रदेश अध्यक्ष नंदकिशोर धोत्रे , पत्रकार अमोल मराठे , कॅमेरामन जुनेद तांबोळी ,नारी शक्ती च्या अध्यक्षा अमिता चोहान , सहा.पोलीस निरि. प्रसाद कुलकर्णी , पितेश मेहता ,महामार्ग सहा.पोलीस निरि.सुभाष ठाकूर आदी उपस्थित होते .
Nagpur News , Amravati News , Vidarbha News, Maharashtra News

Post a Comment