BREAKING NEWS

Friday, July 8, 2016

चांदुर रेल्वे शुक्रवारी जोरदार व सतत पावसाची हजेरी. 2 जुन ते 7 जुलैपर्यंत 286.81 मीमी पावसाची नोंद.

चांदुर रेल्वे- शहेजाद खान /---



 
गेल्या आठवड्यापासून जोर धरलेल्या पावसाने शेतकरी आनंदात असुन जलपातळी समाधानकारकरीत्या वाढवली असली तरी पालिका क्षेत्रातील अनेक समस्या या पावसाने
उघड केल्या आहेत. शहरातील महालक्ष्मी नगर तसेच लिटील स्टार इंग्लीश स्कुल परीसरात रस्त्यांवर जलाशयाचे रूप धारण झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. नागरीकांना तसेच विद्यार्थ्यांना त्याच वाहत्या पाण्यातून वाट काढावी लागत आहे. 2 जुन ते 7 जुलै या दरम्यान तालुक्यात 286.81 मीमी पाऊस झाला असुन शुक्रवारी 8 जुलैला देखील सतत धुव्वाधार पावसाने हजेरी लावली.
   गेल्या आठवड्याभरापासून चांदुर रेल्वे  तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे आसपासच्या भागातील जलसाठय़ांमध्ये समाधानकारक वाढ होत आहे. शहरातील महालक्ष्मी नगर तसेच लिटील स्टार इंग्लीश स्कुल परीसरात रस्त्यांवर पाणी जमा झाल्यामुळे चक्क रस्तेच दिसेनासे झाले आहे. पावसाच्या पाण्याने रस्ता तुंबत असल्याने नागरिकांना याच पाण्यातून प्रवास करावा लागतो आहे. यामध्येच अनेक वेळा शाळकरी मुले सुध्दा पडल्याने याकडे पालिका प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी प्रतिक्रिया शहरवासी देत आहेत. तालुक्यात 2 जुन ते 7 जुलै यादरम्याम  286.81 मीमी पाऊस पडल्यानंतर 8 जुलैला देखील दमदार पाउस शहरात झाला. यामुळे शेतकरीवर्ग सुखावला आहे. यामध्ये तालुक्यात सरासरी चांदूर रेल्वे 18.8, आमला 12.8, घुईखेड-15.4, पळसखेड-7.0, सातेफळ15.4, एकुन-67.02 मीमी व सरासरी -13.44 मीमी ची नोंद झाली. 2 जुन से 7 जुलैपर्यंत एकुन 286.81 मीमी पावसाच्या आकड्याची माहिती प्राप्त झाली आहे. मागील वर्षी 1 जुन ते 7 जुलैपर्यंत 129.38 मीमी पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे यंदा 157 मीमी जास्त पावसाची नोंद झाली.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.