हुबळ्ळी (कर्नाटक) - सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती गेल्या २० वर्षांपासून अध्यात्माची शिकवण देत आहेत. या संघटनांना सामाजिक प्रसारमाध्यमांतून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांचे कार्य जगातील १५० देशांत पसरले आहे. केंद्रात आणि महाराष्ट्रात हिंदुत्वनिष्ठांचे सरकार असूनही सनातनवर बंदी घालण्याचे त्यांनी चालवलेले प्रयत्न निंदनीय आहेत, अशी टीका श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी येथे केली. सनातन संस्थेवर बंदी घालण्याच्या प्रयत्नांना विरोध करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ नेत्यांनी येथे ९ जुलै या दिवशी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेस श्री. मुतालिक यांच्यासह अधिवक्ता चेतन मणेरीकर आणि हिंदुत्वनिष्ठ नेते श्री. दयानंद राव यांनी संबोधित केले. श्री. मुतालिक पुढे म्हणाले की, अनेक हिंदु नेत्यांच्या हत्यांची प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत. तरीही डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना ३ वर्षानंतर अटक करण्यात आली. या प्रकरणी आधीच्या काँग्रेस सरकारने काही निर्दोष व्यक्तींना आधी अटक करून नंतर सोडून दिले. मडगाव स्फोट प्रकरणात ६ साधकांवर खटला दाखल झाला. मात्र या सर्वांना न्यायालयाने निर्दोेष मुक्त केले. सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समिती या संघटना कोणत्याही गैरप्रकारात सहभागी नाहीत, असे न्यायालयांनी वारंवार सांगितले आहे. या उलट सलमान खान, शाहरुख खान सारख्या चित्रपट अभिनेत्यांनी उजळ माथ्यांनी केलेले गुन्हे सरकारला दिसत नाहीत. म्हणून सरकारने सनातनच्या निरपराध साधकांना सोडून द्यावे, अशी मागणी मी करत आहे.

<><><> अध्यात्मप्रसार करणार्या सनातनवर उगाच राग का ? - श्री. दयानंद राव <><><>
अध्यात्मशास्त्र हे भारताचे बळ आहे. भारत एक आध्यात्मिक देश आहे. सनातन संस्था अध्यात्मप्रसार करून समाजात धर्म आणि धार्मिक रूढी यांविषयी जनजागृती करत आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यामुळेच हिंदु राष्ट्र्राच्या स्थापनेसाठी प्रयत्नशील आहेत. मी गेली ४ वर्षे सनातन संस्थेच्या संपर्कात आहे. माझ्यात अनेक सकारात्मक पालट घडून आले आहेत. अशा संस्थेवर बंदी आणण्यासाठी प्रयत्न करणार्या सरकारला हिंदूंचेच साहाय्य लाभत आहे, ही दुर्दैवाची बाब आहे.
पत्रकार परिषदेच्या शेवटी अधिवक्ता चेतन मणेरीकर यांनी विविध न्यायालयांनी सनातन संस्थेशी संबंधित दिलेल्या निकालांतील उतारे वाचून दाखवले.

Post a Comment