सोलापूर--- --/---
सनातन संस्थेच्या स्थापनेचा उद्देश आणि कार्य, तसेच संस्थेवरील कथित आरोपांविषयी संस्थेची भूमिका समजून घेण्याअगोदर संस्थेवर बंदीचा निर्णय घेणे हा सनातनवर मोठा अन्याय होईल. त्यामुळे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने (सीबीआयने) कोणत्याही दबावास बळी न पडता निष्पक्षपातीपणे चौकशी करावी, तसेच राष्ट्र्रप्रेमी सनातन संस्थेचा छळ थांबवण्याविषयी ठोस भूमिका घ्यावी, या मागणीसाठी २९ जुलै २०१६ या दिवशी सोलापूर येथे जिल्हा परिषद गेटजवळ सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. अजित रेळेकर यांना निवेदन देण्यात आले. या वेळी खालील सूत्रे निवेदनात स्पष्ट करण्यात आली.
चौकशीच्या नावाखाली सध्या सनातन संस्थेच्या कोणत्याही साधकाचे नाव वृत्तपत्र अथवा वृत्तवाहिन्या यांद्वारे सातत्याने दाखवून त्यांची बदनामी करण्यात येत आहे. एखाद्यावरील आरोपांची कोणत्याही प्रकारची खात्री झालेली नसतांना अशी नावे येणे हा चारित्र्यहननाचा प्रकार आहे. तरी असे प्रकार त्वरित थांबवण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्र्यांनी यंत्रणांना द्यावेत, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
या वेळी बोलतांना सर्व हिंदुत्ववादींनी एक मुखाने सनातन संस्थेसह अन्य हिंदुत्ववादी संघटनांवर होणारा अन्याय थांबवावा, अन्यथा सर्व हिंदुत्ववादी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील अशी चेतावणी दिली. या वेळी सनातन संस्थेच्या वतीने सौ. विद्या कुलकर्णी, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री तिवारी, सौ. दमयंती रोडे, श्री. दत्तात्रय पिसे, संदीप ढगे, बाबुराव कोळी, विनायक नराल यांसह अनेकांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी सर्वश्री सत्यनारायण गुर्रम, किशोर पुकाळ, केदार पुजारी, रवी गोणे, शिवराज पडशेट्टी, अभिनंदन अगरथडे, रमेश पांढरे, लक्ष्मण साळुंखे, सिद्धेश्वर विटकर, सोमशेखर पासकंटी यांसह ८५ हिंदुत्ववादी उपस्थित होते.

Post a Comment