
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अधिकृतपणे सनातन संस्थेवर बंदीची मागणी करेल कि नाही, या विषयी मनात शंका आहे; मात्र संघाकडून आमची अशी अपेक्षा आहे की, त्यांनी सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांना त्यांच्या गुणदोषांसह स्वीकारायला हवे आणि या संघटनांचे नेतृत्व करायला हवे. खरे तर या देशामध्ये एम्आयएम्सारख्या संघटना आहेत. त्यांच्यावर तात्काळ बंदी घातली गेली पाहिजे. त्यासाठी संघ परिवार, हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि शिवसेनेसारख्या संघटनांनी प्रयत्न केला पाहिजे अन् राजकीय दबाव वापरला पाहिजे; पण जर काही संघटना केवळ जातीय दृष्टीकोनातून सनातनवर बंदीची मागणी करत असतील, तर ती देशासाठी आणि हिंदुत्वासाठी धोक्याची घंटा आहे. ज्या गोष्टी चौकशीतून निष्पन्न व्हायच्या आहेत, त्या योग्य वेळी निष्पन्न होतील; पण त्यासाठी बंदीची मागणी करणे योग्य नाही.
Post a Comment