
संभाजी ब्रिगेडसारखी संघटना जिला बाहेरून निधीपुरवठा होतो आणि हिंदूंना १५ मिनिटांत संपवण्याची भाषा करणार्या अकबरुद्दीन ओवैसी यांचा एम्आयएम पक्ष हे जर युती करू शकत असतील आणि भारतामध्ये सांस्कृतिक आतंकवाद पसरवत असतील, तर त्यांना सनातनवर बंदी घालणे वा त्याची मागणी करण्याचा अधिकार नाही. ज्यांनी ६० वर्षे या देशात सत्ता गाजवली, त्या काँग्रेसलाही अनेक चौकटीतून चौकशा आणि चौकशांचे ससेमिरे मागे लावून सनातन संस्थेवर बंदी आणता आली नाही, तर ज्यांच्या हातात सत्ता असून नोकरशहा त्यांच्या विरुद्ध काम करतात, अशा लोकांनी सनातनवर घातलेली बंदी ही हत्तीच्या पायाला सुतळी बांधण्याचा प्रकार असेल.
Post a Comment