आपच्या घोषणापत्राची तुलना गुरुग्रंथसाहिबशी केल्याचे प्रकरण
सनातन संस्था हिंदूंसाठी कलंक, असे म्हणणारे खेतान हे आपसाठी कलंकच ठरले !
चंडीगड -
पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ता आशिष खेतान यांनी आपपक्षाच्या घोषणापत्राची तुलना गुरुग्रंथसाहिब या शिखांच्या पवित्र धर्मग्रंथाशी केली. त्यामुळे त्यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी प्राथमिक माहिती अहवालाची नोंद करण्यात आली आहे.
पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी आपतर्फे एका प्रचार फलकावर शिखांचे अमृतसर येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या सुवर्णमंदिराच्या शेजारी झाडू दाखवण्यात आला आहे. त्याचबरोबर आम आदमी पक्षासाठी हे घोषणापत्र बायबल,गीता आणि गुरुग्रंथसाहिब आहे, असे विधानही खेतान यांनी केले होते. त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्यावरून ऑल इंडिया शीख स्टुडन्ट्स फेडरेशनचे प्रमुख कर्नल सिंह पीर महंमद यांनी खेतान यांच्या विरोधात अमृतसर येथे तक्रार दाखल केली आहे.
Post a Comment