चांदूर रेल्वे / शहेजाद खान /----
------------------- ’’ पंढरीसी जारे आल्याने,संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग
माजे क निची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी
नाम घेता वाट चाली, यश पाऊला पाऊली ’’ ------------------

विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघलेल्या संत बेंडोजी महाराज पालखीतील वारकरीनि अमरावती, वाशीम, बुलढाणा, जालना, औरंगाबाद असे जिल्हे पार करून पैठण येथील संत एकनाथांच्या पायथ्याशी नतमस्तक होत पुढे संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीसोबत पिंपळदकडे मार्गस्थ झाली आहे.
आषाढी एकादशीच्या महा पवित्र मुहूर्तावर काळ्या सावळ्या विठाईचे दर्शन घेण्याची ओढ आता संपणार असुन संत बेंडोजी महाराज पालखीने पिंपळदकडे मार्गस्थ झाली आहे. राज्यातील हजारो भाविकांचे श्रध्दास्थान तसेच विदर्भातील एकमेव संजीवन समाधी स्थान असलेल्या घुईखेड येथील संत बेंडोजी महाराज पालखीला दिडशे वर्षाची परंपरा आहे. गत २ जुन रोजी निघालेली ही संत बेंडोजी महाराज पालखी टाळ मृदंगाच्या गजरात व विठ्ठल नामाच्या जयघोषात आषढवारीने पंढरपुरकडे आगेकुच करीत बुधवारी लोणदमध्ये पोहचली आहे. येथून पिंपळदकडे मार्गस्थ होणार आहे. या पालखीसोबत हजारो भाविक जुळले आहेत.
संत ज्ञानेश्वर माऊली नंतर स्वतः शिष्य व भक्तांना साक्ष ठेवून १६ व्या वर्षी समाधी घेतलेले परम पूज्य संत बेंडोजी महाराज व सन १९३१ पासून वऱ्हाड प्रांतातील एकमेव असलेल्या पालखीचा मान माऊलीच्या पालखीसह विठ्ठल मंदिरात पुढून प्रवेश करणाऱ्या २१ मानकर्यांमध्ये १७ व्या क्रमांक आहे. ही परंपरा कायम आहे. आजपर्यंत संत बेंडोजी महाराज या संस्थानला संत ज्ञानेश्वर माऊलीच्या काळात सन १३३७ मध्ये असणारे प्राचीन मंदीर म्हणून पहिला बिल्ला, तर दुसऱ्यांदा सन १८१९ असे दोन बिल्ले, असा मान प्राप्त झाला आहे. सर्वात प्रथम खुशाल महाराज यांनी त्या काळात पंढरपूरला पालखी नेण्यासाठी सुरूवात केली होती. शंकरराव बढे, विठोबा काकडे, पुंडलीक येवले, गोडे महाराज ही संत बेंडोजी महाराजांची पालखी घेऊन जात आहे. संस्थानचे अध्यक्ष दिनकर रामचंद्र घुईखेडकर यांच्या नेतृत्वात या पालखीचा दरवर्षी घुईखेड ते पैठण व तेथून आळंदी ते पंढरपूर असा ४८ तासाचा प्रवास वारीतून होतो. पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे या भागातील अनेक तालुक्यातील वारकरी बेंडोजी महाराजांच्या पादुका आपल्या डोक्यावर घेण्याकरीता एकच गर्दी करीत आहे.
Post a Comment