BREAKING NEWS

Saturday, July 9, 2016

12 जुलैला होणार अपंगांना साहित्य वाटप तर घरकुल चेक वितरण सुरू - श्री नितीन गवळींच्या उपोषणाच्या इशाऱ्याने हादरले न.प. प्रशासन, मंगलमुर्ती नगरातील मंदिराच्या बांधकामाची निवीदाहि 8 दिवसात होणार प्रसिध्द.

चांदुर रेल्वे- (शहेजाद खान )-/-------   

 

मुख्याधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे अनेक कामे खोळंबली आहे. वारंवार तक्रारी देवुनही कोणतीही समस्या निकाली न काढल्यामुळे शिक्षण, आरोग्य व स्वच्छता सभापती नितीन गवळी यांनी 18 जुलैपासुन चक्क उपोषणाचा इशारा दिला असतांना नगरपरीषद प्रशासन हादरले असुन नितीन गवळींच्या मागण्यांमधील बंद असलेले घरकुल धनादेश वाटप सुरू झाले आहे. तसेच 12 जुलै रोजी अपंगांना साहित्य वाटप होणार असुन मंगलमुर्ती नगरातील समाज मंदिराच्या बांधकामाची निवीदा येत्या 8 दिवसात प्रसिध्द होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी ठाकरे यांनी पत्रकाव्दारे नितीन गवळी यांना दिली आहे. मात्र इतर मागण्यांवर समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे उपोषणाला स्थगिती दिलेली नाही.
           मुख्याधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे दिवसेंदिवस चांदुर रेल्वे नगरपरीषद चर्चेचा विषय बनत आहे. शहरातील समस्येंकडे त्यांचे कोणतेही लक्ष नसुन दिवसेंदिवस समस्या वाढतच चालल्या आल्या. अनेक तक्रारी देवुनही समस्या निकाली काढल्या जात नाही आहे. यामुळेच त्रस्त नगरसेवक नितीन गवळी यांनी शहरातील विविध मागण्यांसाठी 18 जुलैपासुन उपोषणाला बसण्याचा इशारा एका निवेदनाव्दारे मुख्याधिकारी यांना दिला असतांना त्यांच्या 9 मागण्यांपैकी काही मागण्या उपोषणाला बसण्यापुर्वीच मान्य ही झाल्या आहे. यामधील म्हाडा घरकुल योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना धनादेश वितरीत करण्यात येत आहे तसेच अपंगाच्या निधीतील नगरपरीषद अंतर्गत सन 2015-16 या आर्थिक वर्षात 169000 रूपयाचे साहित्य खरेदी केले असुन अपंगांना त्या साहित्याचे वाटप 12 जुलै रोजी करण्यात येणार आहे. तसेच 2016-17 चा अपंगांचा 3% निधी राखीव असुन अपंगांना आवश्यक साधन सामग्री खरेदी करण्यात येणार आहे. मंगलमुर्ती नगर मधील समाज मंदिराच्या कामाचे 1123800 रूपयांचे अंदाजपत्रक तयार झाले असुन येत्या 8 दिवसात निवीदा प्रसिध्द करण्यात येणार आहे. शेंद्रीपुरा येथील पाईपलाईनच्या कामाला मंजुरात प्राप्त झाली असुन लवकरच काम पुर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहे. यासोबतच इतर 4 मागण्यांची समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्यामुळे उपोषणाला स्थगिती दिलेली नाही. वेळेपर्यंत इतर समस्यांनर व्यवस्थीत तोडगा न निघाल्यास 18 जुलैपासुन उपोषणाला बसणार असल्याचे मत नितीन गवळी यांनी व्यक्त केले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.