मुंबई -

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे (बालभारती) च्या वतीने तयार करण्यात आलेल्या इयत्ता ४ थी च्या (परिसर अभ्यास भाग २, इंग्रजी माध्यम) अंतर्गत शिवछत्रपती पुस्तकातील ४ धडे वगळण्यात आले आहेत. शिवरायांचे सक्षम प्रशासन, शिवरायांची युद्धनीती, जनतेचा राजा शिवाजी आणि प्रेरणेचा जिवंत स्रोत अशी या धड्यांची नावे आहेत. याऐवजी किल्ले आणि नौदल यांचे व्यवस्थापन आणि कल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन हे धडे अंतर्भूत करण्यात आले आहेत. अफझलखानवधाच्या संदर्भात माहिती देतांना वध करतांनाचे चित्र प्रकाशित करण्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराज अफझलखानाला आलिंगन देण्यास जात आहेत, असे चित्र प्रकाशित करण्यात आले आहे.

Post a Comment