चांदूर रेल्वे / शहेजाद खान /-----

नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयातील अर्जनविसने चक्क चांदूर रेल्वे एसडीओ चे बनावट शिक्के व सह्या मारून बोगस जातीचे प्रमाणपत्र बनविल्याची धक्कादायक प्रकरण समोर आले असुन राजु नथ्थुजी राठोड (वय ४८) रा.नांदगाव खंडेश्वर असे त्या अर्जनविसचे नाव आहे. या प्रकरणी एसडीओ यांनी चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनला तक्रार दिली असुन पोलीसांनी अर्जनविसला अटक केली आहे.
नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयातील अर्जनविस राजु नथ्थुजी राठोड यांनी चांदूर रेल्वे उपविभागीय अधिकारी यांच्या नावाचे बोगस शिक्के तयार केले. ऐवढेच नव्हे किशोर संजय मेश्राम नावाने व एसडीओ यांची बनावट सही मारून बोगस जातीचे प्रमाणपत्र तयार करून त्याचा वापर केला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून एसडीओ जनार्धन विधाते यांनी शुक्रवारी स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रार केली.त्यावरून पोलीसांनी आरोपी राजु राठोड विरूध्द भादवी ४२०, ४६८, ४७१,४७२ अन्वये गुन्हा दाखल केले. पोलीसांनी राजु राठोड याला शुक्रवारच्या रात्री दहा वाजता अटक केली. आज शनिवारी दुपारी राजु राठोड याला अमरावतीच्या जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले. न्यायधिशानी त्याला ११ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
<><> असे आले प्रकरण उघडकीस <><>
परेश संजय मेश्राम यांनी नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयातील अर्जनविस राजु राठोड कडे किशोर संजय मेश्राम यांचे जातीचे प्रमाणपत्रासाठी सर्व कागदपत्रे दिले.राठोडनी परेशला किशोर मेश्रामचे जात प्रमाणपत्राकरीत चार दिवसांनी बोलावून त्याला जातीचे प्रमाणपत्र दिले. याकरीता राठोड यांनी परेश वा किशोर मेश्राम यांना कोणत्याच सेतु केंद्रावर नेले नाही व कुठेही सही घेतली नाही. किशोर मेश्राम यांना त्यानंतर शैक्षणिक कामासाठी नॉनक्रिमीलीअरची गरज पडली. त्याने पुन्हा राजु राठोड कडे त्यासाठीचे कागदपत्रे दिली. श्री राठोड यांनी नॉनक्रिमीलीअरसाठी जात प्रमाणपत्रासह सर्व कागदपत्रे जोडून केस नांदगावच्या सेतु केंद्रावरून चांदूर रेल्वे एसडीओ कार्यालयकडे पाठविले. एसडीओ विधाते जात प्रमाणपत्र प्रकरणाची तपासनी करून सही करतांना त्यांचे जात प्रमाणपत्रावरील त्यांच्या सहीवर लक्ष गेले. त्यांना ती सही संशयादस्पद वाटल्यामुळे संपूर्ण प्रकरणाची चौकशाचे आदेश नायब तहसीलदार सुर्यवंशी यांना दिले. श्री.सुर्यवंशी यांनी अर्जनविस राजु राठोड, परेश मेश्राम, किशोर मेश्राम व सेतु चालक खंडार यांची कसुन चौकशी केली. त्यामध्ये परेश यांनी किशोर मेश्रामच्या जात प्रमाणपत्रासाठी त्याची वा किशोरची सेतु केंद्रावर व कुठल्याही अर्जावर सही घेतले नसल्याचे सांगीतले. तर राजु राठोड यांनी ’तो मी नव्हेच ’ ची भूमिका घेतली एमआरसी क्रमांक व ऑन लाईन तपासनी वरून सेतु केंद्र चालक खंडार यांनी सदर कागदपत्र दिले नसल्याचे स्पष्ट झाले आणि बनावट शिक्के व सही मारून राजु राठोड यांनी बोगस जातीचे प्रमाणपत्र तयार केल्याचे सिध्द झाले.
Post a Comment