रंगया रेपाकवार / आलापल्ली/---
आलापल्ली येथे आदिवासी समाजाची संख्या मोठ्या संख्येने आहे व समाजाच्या विविध कार्यक्रमांसाठी एका समाज मंदिराची नितांत आवश्यकता होती व त्यांन्नी ही मागणी घेवुन आदिवासी विकास राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्हाचे पालकमंञी मा..राजे अम्ब्रींशराव महाराज यांची भेंट घेवुन आदिवासी समाज मंदिर मंजूर करण्याचा आग्रह धरला समाजाच्या ह्या मागणीचा मान राखत..राजे साहेबान्नीं तात्काळ आपल्या स्थानिक आमदार निधितुन १० लाख रु कींमतीचा आलापल्ली साठी आदिवासी समाज मंदिर ( गोटुल भवन) मंजूर केला व नुकताच राजे साहेबांच्या शुभ हस्ते ह्या कामाचे भुमीपुजन करुन कामाला शुरुआत करण्यात आली.
यावेळी आलापल्ली येतील आदिवासी गोंड समाजाचे समाजबांधव तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
Post a Comment