BREAKING NEWS

Saturday, July 9, 2016

गडचिरोली जिल्ह्यातील पावसामुळे अनेक भागांचा संपर्क तुटला - गडअहेरी मार्ग बंद, २० ते ३० गावांचे संपर्क तुटले - आलापल्ली – भामरागड मार्ग बंद

रंगय्या रेपाकवार/--अहेरी :-  
 

अहेरी मुख्यालयात  तसेच अहेरी उपविभागात काल पासून सतत दमदार पावसाची हजेरी लागलेली आहे. त्यामुळे जन जीवन विस्कळीत झालेली आहे. अहेरी तालुक्यातील १ कि. मी अंतरावर गडअहेरी पुलावरून पाणी असल्यामुळे जवळ पास २० ते  ३० गावाचे संपर्क तुटलेला आहे. अहेरी मुख्यालयातील आज आठवडी बाजार असल्यामुळे त्यावर हि पावसाचे सावट असणार आहे भामरागड तालुक्यातील  संपर्क तुटला असून
पार्लाकोटा पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे  
भामरागड सह दक्षिण भागात २०० पेक्षा जास्त गावे संपर्कहीन झाले आहेत, तसेच अहेरी तालुक्यातील २० गावांचे संपर्क हीन झाले आहे.
----------------------------------
गडचिरोली जिल्ह्यातील पावसामुळे अनेक भागांचा संपर्क तुटला आहें गोसेखुर्द धरणातून पाणी सोडण्यात येत आहें . मध्य प्रदेशात पाऊस सतत पडत आहें यामुळे गोसेखुर्द धरणाच्या पाण्याची आवक वाढत आहें धरणाचे सर्व दरवाजे उघडले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नदीपात्रालगतच्या गावातील नागरिकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी श्री दुर्वेश सोनावणे यांनी केले आहें  आपत्ती संदर्भात आपण ०७१३२ २२२०३१ या क्रमांकावर संपर्क साधू शकता.अशी माहिती श्री प्रशांत दैठणकर
जिल्हा माहिती अधिकारी
गडचिरोली यांचा मार्फत देण्यात आली आहे

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.