BREAKING NEWS

Saturday, July 30, 2016

जोरदार पावसात गिरगावातील इमारत कोसळली

मुंबई - मुंबईतील गिरगावमध्ये शनिवारी एका इमारतीचा काही भाग कोसळल्याची दुर्घटना घडली. येथील भटवाडी परिसरात असलेल्या पाठारे हाऊस या इमारतीचा काही भाग आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कोसळला.  या इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरील स्लॅब आणि भिंत कोसळल्यामुळे ही दुर्घटना घडली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या चार गाड्या आणि तीन रूग्णवाहिका तातडीने घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. काहीवेळापूर्वीच इमारतीच्या ढिगार्‍याखाली तीनजणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. मात्र, सुरूवातीला  हा परिसर चिंचोळा आणि दाटीवाटीचा असल्यामुळे अग्निशमन दलाला मदतकार्यात अडथळे येत होते. मुंबईत काल रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर आजही कायम आहे. त्यामुळे ही दुर्घटना घडली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. भटवाडी हा गिरगावमधील जुन्या लोकवस्तीचा भाग म्हणून ओळखला जातो.  या भागातील अनेक इमारती जुन्या झाल्यामुळे धोकादायक अवस्थेत आहेत.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.