BREAKING NEWS

Wednesday, July 6, 2016

महाराष्ट्रातील प्रेक्षकांसाठी झी नेटवर्कचे नवे मराठी चॅनेल “झी युवा” -- अश्याप्रकारचे चॅनेल पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला प्रेक्षकांसाठी नाविन्यपूर्ण अनुभव देणारी वाहिनी

अनिल चौधरी ,
पुणे :- 



  : झी नेटवर्क गेले कित्येक  वर्षे महाराष्ट्रातील प्रेक्षकांना उत्तम दर्जाचे आणि सर्वोत्तम असे कार्यक्रम देऊन त्यांचे मनोरंजन करत आहे. झी महाराष्ट्राच्या या कुटुंबातील मग ते झी मराठी असो, झी टॉकीज, झी स्टुडीओ असो वा चोवीस तास प्रेक्षकांना जगभरातील बातम्या पोहचवणारे झी २४ तास असो. जवळजवळ सगळ्याच प्रकारचे चॅनेलस झी नेटवर्कने प्रेक्षकांना उपलब्ध करून दिले आहेत. झी महाष्ट्राच्या याच परिवारात आता अजून एक चॅनेल लवकरच येणार आहे. झी नेटवर्क आपले प्रेक्षकांच्या हृदयात असलेले स्थान आणि ऋणानुबंध अधिक मजबूत करण्यासाठी ऑगस्ट महिन्यात घेऊन येत आहे एक नवे चॅनेल “झी युवा” ... नवे पर्व, युवा सर्व, मनाने चिरतरुण असलेल्या प्रत्येकासाठी. बवेश जानवलेकर (व्यवसाय प्रमुख झी युवा) हे या वाहिनीचे सर्वेसर्वा असणार आहेत.
झी युवा वाहिनीद्वारे मराठी टेलिव्हिजनवर एक नवे पर्व सुरु होणार आहे जे महाराष्ट्रातील प्रेक्षकांना  टीव्ही बघण्याचा नाविन्यपूर्ण अनुभव देणार आहे. आज महाराष्ट्राच्या टेलिव्हीजन बघणाऱ्या लोकसंखे मध्ये अर्ध्याहून अधिक टक्के प्रेक्षकवर्ग हा युवा आहे आणि खास त्यांच्या आवडीसाठी अशी एक वाहिनी असावी या इच्छेने झी नेटवर्क महाराष्ट्राच्या या प्रेक्षकांसाठी झी युवा हि वाहिनी घेऊन येत आहे. जोश, उत्साह, प्रेम, शौर्य, करुणा अश्या तारुण्याच्या पंचरसांनी परिपूर्ण असलेले कार्यक्रम आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहोत. महाराष्ट्रातील कॉलेज युवांपासून ते तरुण पिढीपर्यंत सगळ्यांनाच आवडतील असे जोशपूर्ण, हलके-फुलके, आजच्या प्रेक्षकवर्गाला आपलेसे वाटणारे, चैतन्यपूर्ण असे कार्यक्रम झी युवावर बघायला मिळतील.
महाराष्ट्रातील प्रेक्षकांना काहीतरी नाविन्यपूर्ण देण्याच्या उद्देशातून झी युवा वाहिनी हि संकल्पना नावारूपाला आली. आजच्या तरुण पिढीला आवडणारे, त्यांच्या आयुष्याशी साधर्म्य साधणारे, प्रेरणा देणारे, उत्साहाने परिपूर्ण असे कार्यक्रम देण्याचा निश्चय घेऊन झी युवा वाहिनी महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. झी युवा वाहिनीवर अश्याप्रकारचे विषय हाताळणार आहे जे सध्याच्या मराठी वाहिन्यांवर बघायला मिळत नाही. झी युवा वरील कार्यक्रम आताच्या तरुण पिढीचे त्यांच्या मित्र - मैत्रिणींशी, कुटुंबांशी आणि समाजाशी असलेले नातेसंबंध एका वेगळ्या आणि आधुनिक पध्दतिने दाखविण्याचा प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाच्या हृदयात घर करून जाईल अश्या संकल्पना झी युवा महाराष्ट्रातील प्रेक्षकवर्गासाठी घेऊन येणार आहे.
झी युवा चॅनेलवरील कार्यक्रम हृदयाला भिडणारे, आपलेसे करणारे, नवीन विचारांना प्रोत्साहन देणारे असणार आहेत. बवेश जानवलेकर (व्यवसाय प्रमुख, झी युवा) नवीन चॅनेलसाठी खूपच उत्सुक आहेत आणि ते या चॅनेलकडे सकारात्मक दृष्टीकोनाने बघत आहे यावर आपले मत मांडताना ते म्हणाले, “महाराष्ट्राने झी मराठी, झी टॉकीज आणि झी स्टुडिओला जे अपार प्रेम दिल तोच वारसा झी युवादेखील पुढे चालवेल असा माझा विश्वास आहे, तसेच महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी या तिन्ही वाहिन्यांवर जे निस्सीम प्रेम केल तसच ते झी युवावर देखील करतील याची मला खात्री आहे कारण या वाहिनीवर जे बघायला मिळणार आहे ते याआधी प्रेक्षकांनी कधीच पाहिलं नाही. झी युवा वाहिनीद्वारे प्रेक्षकांना ताणमुक्त, आनंद देणाऱ्या आणि चैतन्यपूर्ण असे कार्यक्रम बघायला मिळणार आहेत, हि नाविन्यता महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मने नक्कीच जिंकेल अस मला वाटत”.
तेंव्हा बघायला विसरु नका महाराष्ट्रातील टीव्ही बघण्याचा नाविन्यपूर्ण अनुभव देणारी वाहिनी झी युवा... नवे पर्व... युवा सर्व !

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.