BREAKING NEWS

Monday, August 1, 2016

एस टी बस व ट्रक ची समोरासमोर धडक - 25 प्रवाशी जखमी तर 7 गंभीर. चांदूर रेल्वे - अमरावती मार्गावरील घटना



शहेजाद खान / चांदूर रेल्वे /----    जशी जशी वाहनांची संख्या वाढत चालली आहे त्याच प्रमाणात अपघात सुधा वाढत आहेत आज चांदूर रेल्वे अमरावती मार्गावर अशीच एक घटना घडली असून एस टी बस व ट्रक ची समोरासमोर धडक  झाली सदर अपघातात एस टी बस  मधील 25 प्रवाशी जखमी झाले तर 7 प्रवाशी गंभीर जखमी झाले तर ट्रक चा वाहक चालक ला सुद्धा दुखापत झालेली आहे. चांदूर रेल्वे येथून रेतीने भरलेला ट्रक क्र mh 40 N ६३३९ अमरावती कडे भरधाव वेगाने जात होता तर अमरावती वरून एसटी बस चांदूर कडे येत होती परंतु चांदूर वरून 1 किलोमीटर अंतरावर  चमकुरा धाब्याजवळ दोन्ही वाहनांची कोणत्यातरी एका वाहन चालकाने दुसऱ्या वाहनास ओवरटेक करण्याचा प्रयत्न केल्यामुळे एस टी बस व ट्रक ची  जोरदार समोरासमोर धडक झाली. सदर अपघातातील सर्व जखमी प्रवाशांना जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये दाखल करण्यात आले असून ट्रक मधील वाहक चालक यांना हि उपचारासाठी दवाखान्यात हलविण्यात आले आहे 

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.