BREAKING NEWS

Monday, August 1, 2016

पाण्यात बुडुन विद्यार्थ्यांचा मृत्यू

 बुलडाणा :-

दयालसिंग चव्हाण/--

संग्रामपुर येथील 8 वी शिकत असलेला विद्यार्थी पवन सुरेश राजनकार या विद्यार्थ्याचा पांडव नदी येथील पाण्यात बुडुण मृत्य़ू झाला . दि.30 जुलै रोजी दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास घटना घडली आहे. पवन चे वडील सुरेश राजनकार हे शेतकरी आहेत . 30 जुलै रोजी रविवार असल्याकारणाने पवन हा मोठा भाऊ व वडील यांना जेवनाचा डबा देण्यासाठी गेला होता . शेताच्या जवळच असलेली पांडव नदी या नदीत पवन आंघोळ करण्यासाठी गेला. पवन हा 14 वर्षा चा होता व परत न आल्याने मृतकाचे वडील चौकशीसाठी नदीकाठावर पाहण्यासाठी गेले  असता पवन हा त्यांना तरंगता दिसले व त्याला तात्काळ खासगी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित करण्याची माहिती दिली. मृतक चे वडील व संग्रामपुर तालुकावासी  असे मागणी करत आहे की रेती तस्करांनी पांडव नदीत मोठमोठे खडडे  पाडुन ठेवले आहेत.  या खडडयाचा अंदाज पवन याला समजले नाही व त्यामुळे खडडयात जाऊन घायल झाल्याने पवन याचा मृत्यू झाला. पवनच्या मृत्यूमुळे संग्रामपुर तालुक्यात अशी खळबळ सुरु असल्याची माहिती दिसुन येत आहे.       

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.