चांदूर रेल्वे / शहेजाद खान /----
चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला विश्वेश्वर येथील दोन शेतकऱ्यांनी नैराश्यतेतून मृत्यूला कवटाळले. कर्ता पुरूष गेल्यामुळे दोन्ही कुटूंबाचा आधारवड हरपला.चांदूर रेल्वेचे उपविभागीय अधिकारी श्री जनार्धन विधाते यांनी
दोन्ही शेतकरी कुटूंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करीत त्वरीत तातडीची मदत केली.
चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला विश्वेश्वर येथील देवराव लक्ष्मणराव वानखडे वय ४८ यांनी ३० जुनच्या दुपारी राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. मागील दोन वर्षात होतं नव्हतं ते सर्वस्व शेतीला लावले. हाती पैसा नसतांना उधारीवर कुठून तरी बियाणं मिळवून पेरणीची तयारी त्यांनी केली होती. ऐनवेळी बियाण्याची सोय न झाल्याने आलेल्या प्रचंड ताणातुन त्यांनी ३० जुनच्या दुपारी राहत्या घरी विष प्राशन करून जिवनयात्रा संपविली. मृतक देवराव यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहीत व दोन अविवाहीत मुली असुन एक बिए ला तर दुसरी दहावीत शिकत आहे.दुसर्या ३० वर्षीय युवा शेतकऱ्याने कर्जापायी गळफास लावुन जीवन संपविले. मृतक मनोज शामराव उईके असे त्याचे नाव असुन त्याच्याकडे ३ एकर कोरडवाहू शेती आहे. त्याने बेसीक फायनान्य कंपनीकडून ३० हजार रूपयाचे कर्ज उचलुन शेतात सोयाबीन पेरले.एका कर्जाचा हप्ता ७४० व दुसऱ्याचे पंधरा दिवसांनी ५०० भरावे लागत होते.त्यामुळे तो आर्थिक विवंचनेत चांगलाच फसला.त्यामुळे घरचे वातावरण तंग झाले.परिणामी पती-पत्नीमध्ये खटके उडत होते.अशातच पत्नी माहेरी निघुन गेली.घरी एकटाच राहत असल्यामुळे आलेल्या कर्जाच्या प्रचंड ताणापायी त्यांने २१ जुलैच्या सकाळी नऊ वाजता राहत्या घरी गळफास लावुन आत्महत्या केली.त्यांच्या पश्चाात पत्नी,सहा,चार व दोन वर्षाच्या तीन मुली व वृध्द आई आहे. दोन शेतकऱ्यांचा कुटुंबांची विदारक स्थिती चांदूर रेल्वेचे उपविभागीय अधिकारी श्री जनार्धन विधाते पाहून गहिवरले.त्यांनी दोन्ही शेतकरी कुटूंबाचे सांत्वन करून त्वरीत थोडी आर्थिक मदत केली. तसेच त्या कुटूंबांना त्वरीत संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवुन देण्यासाठी मंडळ अधिकारी व तलाठी यांना दोन्ही कुटूंबाचे कागदपत्रे स्वतः तयार करून जमा करण्याचे आदेश दिले. तसेच शासकिय मदत त्वरीत मिळवुन देण्याचे त्यांनी आश्वासन कुटूंबियांना दिले.यावेळी तहसीलदार बी.ए.राजगडकर सह महसुल अन्य अधिकारी उपस्थित होते.
Post a Comment