बंगळुरू -

लेनिन करुप्पन नावाच्या व्यक्तीने त्याची मैत्रीण आरती राव हिच्या साहाय्याने स्वामी नित्यानंद यांच्याविरुद्ध वर्ष २०१० मध्ये प्रविष्ट केलेला बलात्काराचा गुन्हा खोटा आणि खोडसाळपणाचा प्रकार असल्याचा निर्णय देऊन तो रहित करण्याचा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला. याआधीही कर्नाटक उच्च न्यायालयाने स्वामी नित्यानंद यांच्या विरुद्ध त्यांच्या हितशत्रूंनी वर्ष २०१२ मध्ये दाखल केलेले गुन्हे रहित केले होते.
१. काही आठवड्यांपूर्वीच उच्च न्यायालयाने पोलिसांना लेनिन करुप्पन याने प्रविष्ट केलेल्या गुन्ह्याचा अन्वेषण अहवाल पुराव्यांसह सादर करण्यास सांगितले होते.
२. या पुराव्यात आरती राव हिने स्वामी नित्यानंद यांनी तिच्यावर वर्ष २००४ ते २००९ या कालावधीत बलात्कार केल्याचे आरोप केले होते; मात्र आरती राव हिच्या वैद्यकीय तपासणीत तिला ४ प्रकारचे अत्यंत संसर्गजन्य रोग असल्याचे आढळून आले होते की, जे केवळ स्पर्शाने दुसर्या व्यक्तीत संक्रमित होऊ शकतात. ३. आरती राव हिच्याच इ-मेलवरील म्हणण्याप्रमाणे तिचा वर्ष २००९ च्या मध्यापासून पुढील ६ मास स्वामी नित्यानंद यांच्याशी शारीरिक संबंध आला नव्हता.
४. स्वामी नित्यानंद यांच्या वैद्यकीय तपासणीत त्यांना कधीही लैंगिक रोगाची लागण झाल्याचे आढळून आले नाही. तसेच स्वामी नित्यानंद यांचे शरीर योगिक असल्याने ते लैंगिक संबंध ठेवण्यात असमर्थ होते, असेही आढळून आले आहे.
५. या सर्व पार्श्वभूमीवर स्वामी नित्यानंद यांचे निर्दोषत्व सिद्ध झाले. आता लेनिन करुप्पन आणि आरती राव यांच्या विरुद्ध स्वामी नित्यानंद यांचा चारित्र्य हननाची धमकी देऊन खंडणी उकलण्यासाठी अपराधिक कट केल्याच्या आरोपावरून खालच्या न्यायालयात खटला चालू आहे.

Post a Comment