BREAKING NEWS

Tuesday, August 2, 2016

सनातन संस्थेवर बंदी घालणे अयोग्य ! - हिंदु धर्माभिमानी <><> सनातन संस्थेवरील बंदीच्या मागणीच्या निषेधार्थ कारवार (कर्नाटक) येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांची पत्रकार परिषद

कारवार (कर्नाटक) -
 

काही हिंदु विरोधकांकडून सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे. या मागणीच्या विरोधात कारवार येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने येथील भद्र हॉटेलमध्ये नुकत्याच एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला विश्‍व हिंदु परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्री. बी.जी. मोहन, सिद्धीविनायक मंदिराचे विश्‍वस्त श्री. उल्लास मुंज, जगद्गुरु श्री नरेंद्राचार्यजी महाराज संप्रदायचे श्री. संतोष महालसेकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. रवी राव, श्री. रामदास कुडतरकर, श्री. प्रशांत पेडणेकर, सौ. धनलक्ष्मी हळदणकर आदी हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. या परिषदेत सर्व हिंदुत्वनिष्ठांनी सनातन संस्थेवरील बंदीच्या मागणीचा तीव्र शब्दांत निषेध केला.
      या वेळी श्री. बी.जी. मोहन म्हणाले, पुरोगाम्यांना काही संशय असल्यास ते न्यायालयात जाऊ शकतात. केवळ दोषारोप करणे चुकीचे आहे. श्री. रामदास कुडतकर म्हणाले, सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करणेच अयोग्य आहे. श्री. रवी राव म्हणाले, सनातन संस्था एक आध्यात्मिक संस्था असून समाजसाहाय्य आणि राष्ट्ररक्षण यांचे कार्य करते. ती समाजाला धार्मिक कृतींमागील शास्त्राविषयी माहिती देते.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.