पंढरपूर -

येथील विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी भाविकांकडून पैसे घेत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मंदिर समितीच्या २ सुरक्षा कर्मचार्यांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी संजय तेली यांनी ही कारवाई केली असून संबंधितांच्या चौकशीचेही आदेश दिले आहेत. १. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी सुरक्षा कर्मचारी आणि मंदिर समितीचे काही कर्मचारी पैसे घेत असल्याच्या तक्रारी अनेक भाविकांकडून करण्यात येत होत्या.
२. मंदिर समितीच्या क्लोज्ड सर्किट टीव्हीमध्ये गोवर्धन बोंबाळे आणि मुकुंद शिंदे यांनी एका भाविक मुलीकडून दर्शनासाठी पैसे घेतल्याचे आढळून आले होते.
३. तत्पूर्वी श्री विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपूजा करणार्या पुजार्यांची बैठक घेऊन श्री विठ्ठलाचे नित्योपचार, पोषाख आणि परंपरा यांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना तेली यांनी केल्या होत्या, तसेच कोणत्याही प्रकारची चूक झाली, तर विनासूचना तात्काळ निलंबित करण्यात येईल, असेही पुजार्यांना सांगण्यात आले होते.
Post a Comment