BREAKING NEWS

Monday, August 1, 2016

आसेगाव-परतवाडा मार्गावर रस्त्यावरील खड्डय़ामुळे अपघात - दोघांचा मृत्यू - चिखलधरा वरून परतत असतानाची घटना

परतवाडा :----  अमरावतीमधील नवसारी येथून सकाळी चिखलदरा येथे फिरायला गेलेल्या काहीई तरुणाचा गाडीला अपघात झाल्याची घटना आज रविवारी घडली  तीन दुचाकीवर ८ मुले सकाळी घरून निघाल्यानंतर दिवसभर चिखलदरा येथे फिरल्यावर तेथून परत येताना हा अपघात झाला. परतवाडा गाठल्यानंतर तळणी फाट्यावर रस्त्याच्या मधोमध खड्डा आल्यामुळे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. गाडी स्लिप झाल्यावर रस्त्याच्या कडेला असलेल्या वळणावर पल्सर २२0 ही दुचाकी पडल्याने त्यावर बसलेल्या तिघांपैकी दोघांना जास्त मार लागला व त्यातच एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसर्‍याचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर जीव गेला. मृतांमध्ये पंकज धुर्वे (१५) व अंकुश देवबाले (१५) यांचा समावेश असून, जखमींमध्ये भूषण पोहोकार, योगेश गाडे आणि अन्य चार जणांचा समावेश आहे.अपघाताची माहिती मृतांच्या कुटुंबांतील सदस्यांसह नातेवाईकांना कळताच जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रचंड गर्दी व आक्रोश, असे चित्र निर्माण झाले होते. मृतांचे आई, वडील, भाऊ, बहीण आपल्या अर्शुंना वाट मोकळी करीत असतानाच आई आपल्या मुलाला पाहण्यासाठी तर बहीण आपल्या भावाला भेटण्याचा हट्ट करीत होती. इतर नातेवाईक सर्वांना सावरण्याचा प्रयत्न करीत होते. मृतांसोबत घालवलेल्या क्षणांचे साक्षिदार मित्रही रडता-रडता आपल्या आठवणी सांगत होते.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.