विजयपूर -

भारतावर प्रतिदिन आक्रमण करणार्या जिहादी आतंकवाद्यांवर प्रथम बंदी घातली पाहिजे. ते सोडून भारतीय संस्कृती जोपासणार्या सनातन संस्थवर बंदी घालणे, हे मानवतेचे लक्षण नाही, असे प्रतिपादन हिंदुस्थान मरुनामकरन् या संस्थेचे अध्यक्ष डॉ. आनंद कुलकर्णी यांनी येथील पत्रकार परिषदेत केले.
हिंदुद्वेष्ट्यांकडून वारंवार सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत असल्याच्या विरोधात येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी प्रसिद्ध अधिवक्ता श्री. तुळशीराम सूर्यवंशी म्हणाले, सनातन संस्था ही एक आध्यात्मिक संस्था आहे. ती समाजात धर्मप्रसाराच्या आधारे समाजातील अयोग्य आचरण थांबवून उत्तम समाजाची निर्मिती करण्याचे कार्य करत आहे. त्यामुळे अशा संघटनेवर बंदी आणणे चुकीचे आहे. छत्रपती फाऊंडेशनचे संस्थापक श्री. किरण काळे म्हणाले, सनातन संस्था ही सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या मातृस्थानी आहे. ती सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांना धर्माचरणाविषयी मार्गदर्शन करते. तेव्हा कोणत्याही कारणामुळे या संस्थेवर बंदी घालण्यात येऊ नये. तसे झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल. या परिषदेला श्रीराम सेनेचे संचालक श्री. आनंद कुलकर्णी, विश्व हिंदु युवा सेनेचे अध्यक्ष श्री. संतोष विश्वकर्मा आदी धर्माभिमानी उपस्थित होते.

Post a Comment