BREAKING NEWS

Tuesday, August 2, 2016

शहीद सप्ताहादरम्यान नक्षल्यांनी एका युवकाची केली गोळय़ा घालून हत्या

रंगय्या रेपाकवार / अहेरी /----

गडचिरोली येथील शहीद सप्ताहादरम्यान नक्षल्यांनी एका युवकाची गोळय़ा घालून हत्या केल्याची घटना  रविवारी रात्री तुमरकसा येथे घडली. राकेश कारू गावडे (२३) असे मृताचे नाव असून, तो अहेरी जवळील  गुर्जा गावचा रहिवासी आहे.
राकेश हा तुमरकसा येथे आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी गेला होता. पोलिस खबर्‍या असल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी त्याची गोळय़ा घालून निर्घृणपणे हत्या केली. या घटनेमुळे दुर्गम भागात दहशतीचे वातावरण पसरले आहे. २८ जुलै ते ३ ऑगस्टपर्यंत नक्षल्यांचा शहीद सप्ताह सुरू आहे. मृत राकेश गावडे हा पदवीच्या दुसर्‍या वर्षात शिक्षण घेता होता. तो उच्च शिक्षणाबरोबरच गावामध्ये नागरिकांना शासकीय योजनांची माहिती देत होता. अशा युवकाची हत्या करून नक्षली विकासाला विरोधच करीत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.