BREAKING NEWS

Tuesday, August 2, 2016

श्री ज्ञानदेव सेवा मंडळ, ठाणे यांच्या वतीने सनातन संस्थेचे प्रवक्ता अभय वर्तक यांचा सत्कार

 ठाणे---




 येथील श्री ज्ञानदेव सेवा मंडळ, ठाणे यांच्या वतीने सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांचा सत्कार करण्यात आला. श्री. वर्तक यांनी श्री ज्ञानदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांची ३१ जुलै या दिवशी सदिच्छा भेट घेतली. त्या वेळी हा सत्कार केला गेला. या वेळी पुरोगामी संघटना, काही सुपारीबाज पत्रकार आणि तपासयंत्रणांतील काही अधिकारी सनातन संस्थेची कशा पद्धतीने अपकीर्ती करत आहेत, याविषयी श्री. वर्तक यांनी उपस्थितांना सांगितले.
        सनातन संस्थेवरील अत्याचारांविषयी जाणून घेतल्यावर श्री ज्ञानदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष, तसेच विश्‍व हिंदु परिषदेचे ठाणे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. एकनाथ महाराज सद्गीर म्हणाले, हा विषय सर्वांपर्यंत पोचणे आवश्यक आहे. आम्ही कीर्तनकारांच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करू. तसेच आपण दिलेल्या कागदपत्रांच्या छायांकित प्रती काढून आम्ही सर्वांना वाटू, तसेच तुम्हाला सर्व सहकार्य करू.
        याप्रसंगी श्री ज्ञानदेव सेवा मंडळाचे उपाध्यक्ष श्री. विजय घोसाळकर, डॉ. जयकृष्ण शिंदे आणि माजी नगरसेवक ह.भ.प. सकपाळ उपस्थित होते. सनातन संस्थेने आम्हाला भेटून भूमिका मांडल्याने आनंद झाल्याचे सर्वांनी सांगितले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.