BREAKING NEWS

Wednesday, August 3, 2016

'सेन्सॉर बोर्डा' च्या 'यू/ए' प्रमाणपत्रामुळे 'डिस्को सन्या' खट्टू



अनिल चौधरी----
पुणे:-



                   महाराष्ट्राचा 'वंडर कीड' म्हणून ओळखला जाणारा पार्थ भालेराव 'डिस्को सन्या' बनून आता प्रेक्षकांसमोर येत आहे. येत्या पाच ऑगस्ट पासून त्याचा 'जय चिंगाबुंगा' हा परवलीचा शब्द  महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ऐकू येणार आहे. मात्र 'सेन्सॉर बोर्डा' ने अनपेक्षितपणे 'यू/ए' प्रमाणपत्र दिल्याने 'डिस्को सन्या' चांगलाच खट्टू झाला आहे. झोपडपट्टीत राहणारा एक अनाथ मुलगा आपल्या अचाट कल्पनेतून आणि अफाट साहसातून एका मस्तवाल श्रीमंत माणसाची मस्ती कशी उतरवितो याची उत्कंठावर्धक कथा 'डिस्को सन्या' मधून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. याशिवाय अनाथ मुलांकडे सहानुभूतीच्या नजरेने पाहिल्यास त्यांचेही जीवन उजळून निघू शकते असा महत्वाचा संदेशही या चित्रपटातून मिळणार आहे मात्र असे असताना 'सेन्सॉर बोर्डा' ने  'डिस्को सन्या' ला अकारण 'यु/ए' प्रमाणपत्र देऊन मुलांना निर्वेधपणे हा चित्रपट पाहण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला आहे. 'सेन्सॉर' च्या या मनमानी निर्णयाबद्दल या चित्रपटाचे निर्माते श्री अभिजित कवठाळकर आणि सचिन पुरोहित यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
>                                 ज्या चित्रपटात क्रूर हिंसेचे दर्शन घडले आहे आणि जो चित्रपट पाहून महाराष्ट्र्रात  जातीय सलोख्याला तडा जाऊन सामाजिक वातावरण 'सैराट' होण्यास मदत झाली त्या चित्रपटालाही सेन्सॉरने 'यु' प्रमाणपत्र दिले होते . विशेष म्हणजे 'डिस्को सन्या' मध्ये  ''तुच विठ्ठल, तुच अल्ला अकबर ....'' यासारखे सर्वधर्मसमभावाला प्रोत्साहन देणारे गाणे असताना तसेच अनाथ मुलांचा महत्वाचा सामाजिक प्रश्न हाताळून त्याद्वारे एक चांगला संदेश देणाऱ्या या चित्रपटाला 'यु/ए' प्रमाणपत्र देऊन 'सेन्सॉर बोर्डाने आपला कोणता हेतू सिद्ध केला?  असा सवालही निर्माते आणि संगीतकार  श्री अभिजित कवठाळकर आणि सचिन पुरोहित यांनी केला आहे. 'सेन्सॉर' च्या या मनमानी निर्णयाच्या विरोधात सर्वांनी आवाज उठविण्याची गरज आहे असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.