चांदुर रेल्वे- (शहेजाद खान )-/

अहमदनगरच्या कोपर्डी येथे शाळकरी मुलीवर अमानुष अत्याचार करून हत्या केल्याच्या घटनेचा स्थानिक माणुसकी बहुउद्देशीय संस्थेच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदविला व याची पुनरावृत्ती होउ नये म्हणुन त्यावर काही उपाययोजना करण्याची मागणी निवेदनातुन करण्यात आली आहे..
सदर घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी आहे. यामुळे जमाजात रोष व्यक्त केल्या जात आहे. यामधील दोषी आरोपींवर कठोर कारवाईची ही मागणी माणुसकी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणुन प्रशासनातर्फे चांगले प्रयत्न व्हावे, आमच्या आई- बहिनी समाजात वावरत असतांना त्यांना सुरक्षीतता लाभावी तसेच प्रत्येक शाळा, महाविद्यालयात, कार्यालये अशा ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्याची नेमनुक करावी व त्यांच्या सुरक्षतेसाठी कार्यक्रम राबवावे अशी मागणी ठाणेदार गिरीष बोबडे, उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते आदींना दिलेल्या निवेदनातुन केली आहे. तसेच शहरातील शाळा, महाविद्यायांत जाउन मुख्याध्यापकांना सुध्दा निवेदन देण्यात आले.
यावेळी माणुसकी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्राविण्य देशमुख, उपाध्यक्ष भुषण सरदार, सचिव संकेत पुंड, कोषाध्यक्ष प्रतिक रॉय, व्यवस्थापक सनी सावंत, सदस्य अश्विनी विश्वकर्मा, रीता खंडारे, अनुजा इंगळे, अमृता डुबे, स्वप्नील खेडकर, जिवन शेळके, मनोज चुडे, ह़्रृषीकेश ठाकरे, अमोल ठाकरे, शुभम देशमुख, अमोल ओगले, धनंजय पेटकर, नकुल राऊत, दिनेश वाघाडे, गोपी शिरभाते आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Post a Comment