BREAKING NEWS

Wednesday, August 3, 2016

संडासच्या अनुदानावरून पळसखेड येथे जोरदार भांडण - सरपंच व तिघांची परस्परांना अश्लिल शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी, पळसखेड सरपंचासह अन्य तिघांवर गुन्हे दाखल


चांदूर रेल्वेः/ शहेजाद खान /--- संडासचे शासकिय अनुदान लवकर द्या या कारणावरुन पळसखेड सरपंच व अन्य तिघांत जोरदार भांडण होऊन परस्परांना जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना चांदूर रेल्वे तालुक्यातील पळसखेड गावी आठवडी बाजारात बुधवारी सकाळी ८ वाजता घडली.
आजच्या आज संडासचे शासनामार्फतचे  अनुदान काढुन द्या असे पळसखेडचे अफसर खॉ पठाण, शाबिर खॉ मोहमंद खान व अफजल खॉ रहिम खॉ पठाण यांनी सरपंच रविकांत अनिल देशमुख यांच्याशी हुज्जत घातली. सरपंच रविकांत देशमुख यांनी शासन नियमानुसार पैसे मंजुर होऊन आल्यानंतर देईल असे म्हटले असता तिघांनी त्याला अश्लिल भाषेत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. तर पळसखेडचे अफजल खॉ रहिम खॉ पठाण (वय ३२) यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये ते व त्यांचे काका शब्बीर मोहमंद खॉ पठाण बाजारातुन जात असतांना सरपंच रविकांत देशमुख रस्त्यात दिसले असता फिर्यादी अफजलने तु काल माझा काकांना शिवीगाळ केली तसेच आमचे संडासचे शासकिय अनुदानाचे काम का करीत नाही असे विचारले असता सरपंच रविकांत देशमुख यांनी त्यांना अश्लिल भाषेत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. या दोन्ही प्रकरणी चांदूर रेल्वे पोलीसांनी सरपंच रविकांत देशमुख (वय ४९) यांच्यावर भादंवी कलम २९४, ५०६ अन्वये आणि अफसर खॉ पठाण, शाबिर खॉ मोहमंद खान व अफजल खॉ
रहिम खॉ पठाण यांच्यावर भादंवी कलम २९४, ३२३, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.