BREAKING NEWS

Wednesday, August 3, 2016

गळफास लावुन युवा शेतकऱ्याची आत्महत्या, राजना येथील घटना -सततच्या नापिकीने संपविले जीवन


चांदूर रेल्वेः/ शहेजाद खान

सततच्या नापिकी व कर्जापायी ३५ वर्षीय युवा शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास लावुन आत्महत्या केल्याची घटना चांदूर रेल्वे तालुक्यातील राजना या गावी बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडली. हेंमत भिमराव भेंडे (वय ३५ )रा.राजना असे त्या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे.
मागील तीन वर्षापासुन सतत नापिकीने हेंमत भेंडे त्रस्त होते. यावर्षी कर्ज काढुन त्याने शेतात सोयाबीन पेरले. सततच्या पावसामुळे यंदाही सोयाबीन चाट देईल का याची धास्ती हेंमतने घेतली. अशातच ३ ऑगष्टला पत्नी व आई कामाला गेले व घरी कोणी नसल्याचे पाहून त्याने घराच्या छताला गळफास लावुन आत्महत्या केली. त्याच्याकडे स्टेट बँक ऑफ इंडिया, चांदूर रेल्वे शाखेचे ४० हजार रूपये कर्ज आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, वृध्द आई,१० व ६ वर्षाच्या दोन लहान मुली व दोन लहान भाऊ आहेत. चांदूर रेल्वे पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेवुन पुढील तपास करीत आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.