BREAKING NEWS

Wednesday, September 28, 2016

धुळे येथे मराठ्यांचा जनसैलाब- कडक उन्हामुळे 102 जन रुग्णालयात दाखल

धुळे :- 

कोपर्डी बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ धुळ्यात आज मराठा समाजाचा विशाल अश्या मोर्चाचे आयोजन सकाळ मराठा समाज कडून करण्यात आले होतेप्रचंड प्रमाणात मराठ्यांची उपस्थिती यातदिसून आली परंतु आज धुळ्यात वातावरण प्रचंडगरम असल्यामुळे
 काढण्यात आलेल्या विराट मूक मोर्चामध्ये हजेरी लावण्यासाठी आलेल्या 102 जणांना कडक उन्हामुळे चांगलीच बाधा निर्माण झाली. त्यानंतर या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
राज्यभरात मराठा समाजाच्या वतीने कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ मूक मोर्चे काढले जात आहेत. या मोर्चांमध्ये मराठा समाजाचे लोक मोठय़ा संख्येने सहभागी झाले. अनेक ठिकाणी या मोर्चादरम्यान पडणाऱया भर पावसातही असंख्य लोक उपस्थित राहिले होते. त्यानंतर आज धुळ्यात मोर्चेकरांना कडक उन्हाचा चांगलाच फटका बसला. या कडक उन्हाचा त्रास होऊ लागल्याने यातील 102 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सकाळी 11 वाजता गिंदोडिया चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून शिवतीर्थ चौकापर्यंत हा मोर्चा सुरुवात झाली.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.