BREAKING NEWS

Tuesday, September 27, 2016

(म्हणे) गोवंश हत्या बंदी कायदा रहित करा ! शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांचे गोद्रोही विधान !

       नगर, - राज्य सरकारने शेतकरी विरोधी कायदे रहित करावेत, तसेच राज्य सरकारने गोवंश हत्या बंदी कायदा केल्याने शेतकर्‍यांच्या पशुधनावर गदा आली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना भाकड आणि निरुपयोगी जनावरे संभाळावी लागत आहेत. कायदा झाल्याने कुरेशी समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे गोवंश हत्या बंदी कायदा रहित करा, अन्यथा नागपूरला मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येईल, असे विधान शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली येथील ईदगाह मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शेतकरी संघटना आणि कुरेशी समाज यांच्यासमवेत शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी २६ सप्टेंबर या दिवशी मोर्चा काढण्यात आला. या वेळी कुरेशी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.