BREAKING NEWS

Tuesday, September 27, 2016

आज लोकशाहीची व्याख्या स्वार्थी नेत्यांचे, 'स्वार्थी नेत्यांसाठी, स्वार्थी नेत्यांकडून शासन', अशी बनली आहे ! - पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

आसनसोल (बंगाल) येथे राज्यस्तरीय हिंदू अधिवेशनाचे आयोजन 
डावीकडून श्री. उपानंद ब्रह्मचारी, श्री. सुभाष चक्रवर्ती आणि बोलतांना पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
     आसनसोल (बंगाल) - वर्ष २०१२ मध्ये गोवा येथील अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा सर्व संमतीने विषय मांडण्यात आला होता. त्या हिंदु राष्ट्राच्या ठिणगीने आज मशालीचे रूप धारण केले आहे. लोकशाहीची व्याख्या आहे, 'जनतेचे, जनतेकडून, जनतेसाठी शासन !'; परंतु सध्या यात पालट होऊन 'स्वार्थी नेत्यांचे, स्वार्थी नेत्यांसाठी, स्वार्थी नेत्यांकडून शासन !' असे झाल्याचे दिसून येत आहे. आमचे पंतप्रधान म्हणतात, 'राज्यघटना त्यांचा धर्मग्रंथ आहे.' राज्यघटनेतील समान नागरी कायदा, गोहत्या बंदी कायदा हे सर्व देशात असावेत, अशी तरतूद सांगण्यात आली आहे. मग यावर कोणीही कृती करण्यात येत नाही, तर खर्‍या अर्थाने धर्माचे पालन होत आहे का ? असा प्रश्‍न मनात निर्माण होतो, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. ते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २२ सप्टेंबरला येथील गोराई स्मृती भवनमध्ये आयोजित राज्यस्तरीय हिंदू अधिवेशनाच्या व्यासपिठावरून बोलत होते.

     या वेळी बंगाल आणि झारखंड या राज्यांतून आलेल्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींसह १११ हिंदु धर्माभिमानी उपस्थित होते. या अधिवेशनाला पू. स्वामी तेजशानंद यांचीही वंदनीय उपस्थिती लाभली.
बंगालमध्ये अनेक ठिकाणी दुर्गोत्सव बंद होत आहेत !
- श्री. सुभाष चक्रवर्त्ती, निखिल बंग नागरिक संघ 
     धर्मनिरपेक्षतावादाची निरर्थकता आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता याविषयी बोलतांना निखिल बंग नागरिक संघाचे श्री. सुभाष चक्रवर्ती म्हणाले, "बंगालमध्ये अनेक ठिकाणी दुर्गोत्सव बंद होत आहे. बंगालमधून ४०० मुसलमान युवक 'इसिस'च्या प्रशिक्षणासाठी सिरियात गेल्याचे वृत्त आहे. या सर्व विषयांकडे डोळेझाक करून राज्यभरात धर्मनिरपेक्षतावादाचा खोटा ढोल बडवला जात आहे. हे हिंदूंसाठी एक मोठे आव्हान आहे."
बंगालमध्ये धर्मांतरित आदिवासी हिंदूंना मिळते 
'ओबीसी' सवलत ! - श्री. उपानंद ब्रह्मचारी, संपादक, 'हिंदु एक्सिस्टन्स' 
     पंतप्रधानांनी गोरक्षकांविषयी निराशाजनक वक्तव्य केल्यामुळे गोहत्या करणार्‍यांना गोहत्येची एक प्रकारे मूकसंमतीच मिळाली आहे. दुसरीकडे बंगालचे मुख्यमंत्री नागरी पोलिसांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक मुसलमानांची भरती करत आहेत. हिंदु आदिवासी ख्रिस्ती झाल्यावर त्यांना 'ओबीसी' म्हणून सवलती देण्यात येत आहे. त्यामुळे धर्मांतर थांबवणे कठीण झाले आहे.
साधना केल्याने व्यक्ती धर्मनिष्ठ बनते ! - प्रदीप खेमका, सनातन संस्था, झारखंड
     साधना केल्याने व्यक्ती धर्मनिष्ठ बनते. धर्मनिष्ठ व्यक्ती स्वत:हून हिंदु धर्माला हानी पोचवत नाही आणि दुसर्‍यांकडून करण्यात आलेली धर्महानी सहन करत नाही. म्हणून साधना करणाराच धर्मरक्षणाचे खरे कार्य करू शकतो. 
अधर्मी हिंदूंचे आपत्काळात ईश्‍वर रक्षण करणार नाही !
- श्री. विकर्ण नस्कर, प्रमुख, धर्म उत्थान समिती 
     बंगालमध्ये बहुतांश लोक आयुष्यभर धर्मपालन करत नाहीत. मृत्यूच्या वेळी त्यांच्या छातीवर 'गीता' ठेवली जाते. आज पुरोहितांच्या दक्षिणेचे रुपांतर मानधनात होणे, हे त्यांचे अज्ञान आणि अधःपतन आहे. अधर्मी हिंदूंचे आपत्काळात ईश्‍वर रक्षण करणार नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे.
 क्षणचित्रे 
१. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मागदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून अधिवेशनाला प्रारंभ करण्यात आला.
२. अधिवेशनामध्ये हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले.
३. अधिवेशनाचा उद्देश समितीचे पूर्व आणि पूर्वोत्तर भारत समन्वयक श्री. चित्तरंजन सुराल यांनी सांगितला.
४. 'राष्ट्रीय हिंदू आंदोलना'चे लाभ आणि या आंदोलनाचे आयोजन कसे करावे ? यावर धनबाद, झारखंंड येथील रणरागिणीच्या कु. निशाली यांनी मार्गदर्शन केले.
५. जमशेदपूर येथील समितीचे श्री. आलोक पांडे यांनी 'राष्ट्रीय हिंदू आंदोलना'चे अनुभव सांगितले.
६. आसमसोल येथील धर्माभिमानी युवकांनी संघटितपणे सक्रीय होऊन अधिवेशन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. 

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.