BREAKING NEWS

Friday, October 21, 2016

महाराष्ट्र १ वाहिनीचे वादग्रस्त संपादक निखिल वागळे यांचा पत्रकाराकडून निषेध !

श्री अभय वर्तक यांना 
अपमानास्पद वागणूक दिल्याचे प्रकरण !


        पंढरपूर - सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांचा अवमान केल्याविषयी येथील पत्रकार श्री. द्वैपायन वरखेडकर यांनी महाराष्ट्र १ वाहिनीचे संपादक निखिल वागळे यांना पत्र पाठवून निषेध केला आहे. या निषेधपत्रात श्री. वरखेडकर यांनी लिहिले आहे, अन्य वाहिन्यांप्रमाणे मी महाराष्ट्र १ या वृत्तवाहिनीचाही नियमित प्रेक्षक आहे. 
        १८ ऑक्टोबर या दिवशी रात्री आजचा सवाल या कार्यक्रमात सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांना त्यांचे मत मांडण्यासाठी आपण बोलावले होते. त्या वेळी श्री. अभय वर्तक हे स्वत:चे मत-विचार मांडत असतांना अचानक आपण आक्रस्ताळेपणा करीत त्यांना येथून निघून जा, येथून पुढे सनातनच्या लोकांना मी बोलावणार नाही इत्यादी प्रकारची अनेक चुकीची वाक्ये बोलून अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली. त्यांना विचार पूर्णपणे मांडण्याची संधी न देताच त्यांना हाकलून दिले. ही गोष्ट शिष्टाचाराला आणि सुसंस्कारितेला धरून नाही. एका पत्रकारासाठी तर हे कृत्य फारच अशोभनीय आणि चुकीचे आहे. पत्रकाराकडून अशी वागणूक अपेक्षित नाही. मी स्वत: एक पत्रकार असून पत्रकाराने लोकांशी असे वागण्यास माझा आक्षेप आहे. 
        श्री. वरखेडकर यांनी निषेध करतांना पुढे लिहिले आहे, तुमच्यासारखे पत्रकार संपूर्ण पत्रकारितेला कलंक आहेत. आपण श्री. अभय वर्तक यांची त्वरित क्षमा मागावी आणि येथून पुढे असे वागू नये. अन्यथा पत्रकार म्हणून काम करण्याचा आपणाला अधिकारच नाही, असे मी समजतो. 

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.