BREAKING NEWS

Friday, November 11, 2016

चांदूर रेल्वे नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०१६ - अध्यक्ष पदासाठीचा उमेदवारीतून 2 तर नगरसेवक पदासाठीचा उमेदवारीतून ५ उमेदवारांची माघार

चांदूर रेल्वे / शहेजाद खान /--   


नितीन विष्णू गवळी (अपक्ष)

निलेश विश्वकर्मा(अपक्ष)





 चांदूर रेल्वे नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०१६  येत्या २७ नोहेंबर ला होऊ घातली आहे यावेळी नगराध्यक्ष पदाची निवडणूक थेट जनतेतून होणार आहे यासाठी नामनिर्देशन पत्र भरण्याचा अखेरचा दिवसापर्यंत १३ उमेदवारांनी १५ अर्ज दाखल केले होते त्यात ५ अर्ज हे नामंजूर झाले  उर्वरित उमेदवार पैकी आज अर्ज मागे घेण्याचे दिवशी  विनय वसंत कडू -अपक्ष , तर स्वप्नील दिनकर मानकर -शिवसेना यांनी आपला अर्ज मागे घेतला त्यामुळे आता प्रत्यक्ष मैदानात सर्व श्री गणेश रॉय(रा.कॉंग्रेस), नितीन विष्णू गवळी (अपक्ष), निलेश रमेश सूर्यवंशी(कॉंग्रेस) , नंदकिशोर खेरडे(अपक्ष) , प्रमोद मधुकर नागमोते(भाजपा) , निलेश विश्वकर्मा(अपक्ष) असे एकूण 6 उमेदवार रिंगणात आहे. तर नगरसेवक पदासाठी  6 प्रभागातून ११० उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते त्यात 1 अर्ज नामंजूर झाला होता आज प्रत्यक्ष उमेदवारी मागे घेण्याचा दिवशी प्रभाग क्रमांक ४ मधून मंगेश वाघ व पंकज भैसे दोन्ही अपक्ष यांनी प्रभाग क्रमांक ३ मधून जागो बखतमल वाधवानी अपक्ष , प्रभाग क्र 6 अ मधून आनंद मनोहर वरठे अपक्ष , व प्रभाग क्रमांक ८ अ मधून गुणवंत सयामे अपक्ष ,अशा ५ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले  निवडणुकीत उभ्या असलेल्या  नगरसेवक पदाकरिता उद्या चिन्ह वितरीत होणार आहे तेव्हाच कुठे निवडणुकीची खरी रणधुमाळी सुरु होईल.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.