![]() |
पत्रकार परिषदेत डावीकडून सर्वश्री मधुकर नाझरे, अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर,
शिवानंद स्वामी, बाबासाहेब भोपळे (छायाचित्रकार : श्री. गजानन नागपुरे, कोल्हापूर)
|
- कोल्हापूर विशेष अन्वेषण पथक आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदन सादर !
- कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण !
कोल्हापूर- येथील श्रमिक प्रतिष्ठानने प्रकाशित केलेल्या कोल्हापूरच्या रस्त्यांचा प्रश्न काय आहे ? या पुस्तकात कॉ. पानसरे यांचा येथील पथकर प्रकरणीच्या नेतृत्वाचा उल्लेख आहे. या पुस्तकात पथकरप्रश्नी राजकीय नेते, नगरसेवक आणि प्रशासकीय अधिकारी यांनी पैसे घेतल्याविषयी धक्कादायक माहिती देण्यात आली आहे. पोलिसांची अन्वेषणाची दिशा भरकटलेली आहे. कॉ. पानसरे प्रकरणातील योग्य मारेकर्यांपर्यंत पोचण्यासाठी पोलिसांनी या दिशेने अन्वेषण करावे, अशी मागणी सर्वश्री मधुकर नाझरे, शिवानंद स्वामी आणि बाबासाहेब भोपळे यांनी ११ नोव्हेंबर या दिवशी शाहू स्मारक येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. हे तिघे हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आहेत. या वेळी हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर उपस्थित होते.

Post a Comment