
सनातनचे कार्य अप्रतिम असून राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी अत्यंत तळमळीने झटणारी ही एकमेव संघटना आहे. आज जे कोणी छापत नाही, ते सनातन प्रभात छापते. प्रत्येकानेच सनातन प्रभातचे वाचन केले, तर त्यांना राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्यस्थितीची जाणीव होईल. अन्य हिंदुत्ववादी नियतकालिके मी वाचत होतो; पण सनातन प्रभातपुढे आता सर्वच फिके वाटते. प्रामाणिकपणे आणि निष्ठेने त्याग आणि समर्पण या भावाने सेवा करणारे साधक हेच सनातनचे बळ आहे. आम्हीही सनातनच्या समवेत आहोत. त्यांनी केव्हाही हाक मारावी, आम्ही सनातनच्या राष्ट्र आणि धर्मरक्षणाच्या कार्यात प्राणपणाने सेवा करण्यास सिद्ध आहोत.
या वेळी पू. भिडेगुरुजी यांना सातारा धर्मादाय आयुक्त कार्यालयातील अधीक्षक यांनी दिलेल्या अंनिसच्या संदर्भातील अहवालाची माहिती श्री. राहुल कोल्हापुरे यांनी दिली. यामधील काही गंभीर गोष्टींची नोंद पू. भिडेगुरुजी यांनी घेतली. या वेळी पुन्हा एकदा आम्ही सनातनच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत, असे उत्स्फूर्त उद्गार पू. भिडेगुरुजी यांनी काढले. तसेच तुम्ही आणि सनातनची काही ज्येष्ठ मंडळी यांची मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत चर्चा घडवून आणण्यासाठी मी प्रयत्न करतो. ही भेट किमान अर्धा घंटा कशी घडवून आणता येईल, असा माझा प्रयत्न राहील, असे पू. भिडेगुरुजी या वेळी म्हणाले.
Post a Comment