
| डावीकडे पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांना माहिती देतांना श्री. राहुल कोल्हापुरे |
सातारा- आतापर्यंत मी अनेक दैनिकांचे वाचन केले. त्यांचे विचारही अनुभवले. आंधार पडल्यावर काजवे चमकू लागतात, तारे चमकू लागतात, चंद्र प्रकाशित होतो; मात्र या सर्वांपुढे जेव्हा सूर्य उगवतो, तेव्हा या सर्वांचा प्रकाश नसल्याप्रमाणे होतो. दैनिक सनातन प्रभातचेही तसेच आहे. दैनिक सनातन प्रभात म्हणजे आकाशात तळपणारा सूर्य आहे, असे गौरोवोद्गार श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी काढले.
येथील नवीन एम्.आय.डी.सी.मध्ये एका कार्यक्रमासाठी पू. भिडेगुरुजी आले होते. तेव्हा दैनिक सनातन प्रभातच्या वार्ताहराशी ते बोलत होते. या वेळी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाप्रमुख श्री. सतीश (बापू) ओतारी, सर्वश्री सुधन्वा गोंधळेकर, आेंकार डोंगरे, चंदन जाधव, संभाजी जगताप, हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनायक कुलकर्णी आदी उपस्थित होते.
Post a Comment