BREAKING NEWS

Saturday, November 12, 2016

हिंदुत्वनिष्ठ नेते शिवप्रसाद जोशी यांची शिवसेनेचे गोवा सहराज्यप्रमुखपदी नेमणूक !

श्री. शिवप्रसाद जोशी
 पणजी - हिंदुत्वरक्षणाची तळमळ असलेले गोव्यातील हिंदुत्वनिष्ठ नेते श्री. शिवप्रसाद जोशी यांची शिवसेनेचे सहराज्यप्रमुखपदी नेमणूक करण्यात आली आहे. १२ नोव्हेंबर या दिवशी पणजी येथील पत्रकार परिषदेत शिवसेनेचे गोवा राज्य संपर्कप्रमुख श्री. संजीव कामत यांनी या नेमणुकीविषयी घोषणा केली.
श्री. संजीव कामत म्हणाले, शिवसेनेचा गोव्यात व्याप वाढला आहे. हा वाढता व्याप सांभाळण्यासाठी शिवसेना गोवा राज्यप्रमुख सुदीप ताम्हणकर यांच्या बरोबरीने श्री. शिवप्रसाद जोशी पक्षाच्या गोव्यातील कार्याची धुरा सांभाळणार आहेत. पेडणे येथील श्री. शिवप्रसाद जोशी हे गेली अनेक वर्षे हिंदु महासभेच्या माध्यमातून हिंदुत्वाचे कार्य निरपेक्षपणे करत आहेत. गेली अनेक वर्षे ते हिंदु महासभेचे गोवा अध्यक्ष आहेत, तसेच त्यांचा आध्यात्मिक स्तर ६१ टक्के आहे. 


समाजाच्या सर्वांगीण हितासाठी कार्य करू ! - श्री. शिवप्रसाद जोशी


    गोव्यात शिवसेनेकडून समाजकारणाच्या माध्यमातून राजकारण केले जाईल. सर्व शिवसैनिकांना सोबत घेऊन राज्यात हिंदुत्वाचे कार्य शिवसेनेच्या माध्यमातून वाढवले जाईल. प्रत्येक मतदारसंघात हिंदुत्वाचा झेंडा रोवण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि समाजाचे सर्वांगीण हित साधण्यासाठी पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाने वाटचाल करू. यापुढे शिवसेनेची सत्तेच्या दिशेने वाटचाल असेल. आम्ही सक्षम सरकार देऊ, असा आम्हाला विश्‍वास आहे. सर्वांनी या कार्यात सहकार्य करावे आणि आशीर्वाद द्यावेत, असे श्री. शिवप्रसाद जोशी या वेळी म्हणाले. 

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.