BREAKING NEWS

Monday, November 28, 2016

अंनिसवर बंदी घालण्याच्या संदर्भात अन्न आणि नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांना निवेदन

श्री. गिरीश बापट (उजवीकडे) यांना निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते
     पुणे- अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली समाजाला नास्तिकतेकडे नेणार्‍या अंनिसचा भ्रष्ट चेहरा सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, तसेच हिंदु विधीज्ञ परिषद यांनी उघडा पाडला होता. अंनिसविरोधात करण्यात आलेल्या तक्रारींची नोंद घेत सातारा येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या अधीक्षकांनी चौकशी अहवालामध्ये अंनिसवरील आर्थिक घोटाळ्यांच्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचे नमूद करून अंनिसवर प्रशासक नेमावा असे सूचित केले होते. नुकतेच केंद्रीय गृहमंत्रालयानेही अंनिसची एफ्सीआर्ए नोंदणी रहित केली होती. या पार्श्‍वभूमीवर घोटाळेबाज अंनिसची सखोल चौकशी करून बंदी घालण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन अन्न आणि नागरी पुरवठामंत्री, तसेच पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना देण्यात आले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री दीपक आगवणे आणि गजानन केसकर उपस्थित होते. 

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.