इचलकरंजी येथील श्री. अशोक साळुंखे यांना धर्मांधांनी मारहाण केल्याचे प्रकरण
![]() |
| पोलीस निरीक्षक सतीश पवार यांना निवेदन देतांना बुरूड समाज संघटनेचे पदाधिकारी |
इचलकरंजी-बाळनगर येथील श्री. अशोक साळुंखे यांच्यावर प्राणघातक आक्रमण करून घरातील महिलांनाही मारहाण करणारे धर्मांध सलीम अत्तार, इरफान सय्यद आणि फरिदा सय्यद यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन अखिल भारतीय महाराष्ट्र बुरूड समाज संघटनेच्या वतीने शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश पवार यांना नुकतेच देण्यात आले. संघटनेच्या शिष्टमंडळात अध्यक्षा शामला सोनावणे, सरचिटणीस मारुती साळुंखे, दत्तात्रय सूर्यवंशी, धोंडीराम सूर्यवंशी, रामचंद्र सपाटे, वसंत सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, श्री. साळुंखे यांच्यावर १३ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या आक्रमणात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांनी धर्मांधांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती; मात्र पोलिसांनी तक्रार बेदखल करत धर्मांधांवर कोणतीही कारवाई केलेली नाही.
यापूर्वी बुरूड समाजातील महादेश आणि अविनाश सूर्यवंशी यांच्यावर आक्रमण झाले होते. त्यामुळे समाजातील नागरिकांना योग्य सुरक्षा मिळावी आणि आक्रमणकर्त्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Post a Comment