चांदुर रेल्वे:- (शहेजाद खान )-
नगर परिषद अध्यक्ष व नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शुक्रवार शेवटच्या दिवशी शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार स्वप्निल मानकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार नीलेश विश्वकर्मा यांना पक्षाचे जाहिर समर्थन दिले आहे. नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराला सुरवात झाली असतांनाच् सर्वच उमेदवार आपापल्या परीने जोर लावत आहे. अशातच नीलेश विश्वकर्मा यांना विविध पक्षाचे, सामाजिक संघटनेचे समर्थन मिळत आहे. नीलेश विश्वकर्मा हे नगर अध्यक्ष पदासाठी सक्षम उमेदवार असून त्यांना आम्ही जाहिर समर्थन देत असल्याचे सांगत त्यांना बहुमताने विजयी करणार असल्याचे सांगितले, शुक्रवारी विनय कड़ू यांनी ही आपला अध्यक्ष पदाचा अर्ज मागे घेतल्याने अध्यक्ष पदाच्या शर्यतीत ६ उमेदवार राहिले असून आज अपक्ष उमेदवारांना बोध चिन्ह मिळाल्यानंतर प्रचाराची धूम सुरु होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर शिवशेनेच्या पदाधिकारी यांनी नीलेश विश्वकर्मा यांच्या प्रचार कार्यालयात जाऊन त्यांना आपले समर्थन जाहिर केले. यावेळी शिवशेनेचे तालुकाध्यक्ष राजू निम्बर्ते, बंडू आंबटकर, राजूभाऊ मेटे, सुरेश यादव, किशोर यादव, रविन्द्र वांढरे, गजानन यादव, हेमंत हटवार, संदीप जरे,गजानन जरे,गजानन चव्हाण,राम भोसले, रोशन खंडार, गजानन बोबडे,प्रमोद खवड, त्रिलोक मानकानी, गणेश गिरपुंजे, मोरेश्वर राजुरकर यांच्यासह नगरसेवक पदाचे उमेदवार सतपाल वरठे, विनोद वानखड़े आदीं उपस्थित होते..
Post a Comment