BREAKING NEWS

Saturday, November 19, 2016

ओवैसी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार घालण्याच्या कार्यक्रमास अनुमती नाकारा !

  • असे हिंदु धर्माभिमानी सर्वत्र हवेत ! 
  • बजरंग दलाची निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे मागणी 

Image result for शिवाजी महाराज
       कुरुंदवाड (जिल्हा कोल्हापूर) - येथे २० नोव्हेंबर या दिवशी निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने खासदार ओवैसी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. दैनिक महान कार्य या वृत्तपत्रातील वृत्तानुसार कुरुंदवाडमधील शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास त्यांच्या हस्ते पुष्पहार घालण्याचा कार्यक्रम होणार आहे. हिंदु धर्माचा द्वेष नसानसात भिनलेल्या अशा व्यक्तीकडून छत्रपतींची होणारी ही विटंबना बजरंग दल कदापी सहन करणार नाही. तरी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्याच्या कार्यक्रमावर प्रशासनाने बंदी घालावी, अन्यथा बजरंगींना छत्रपतींच्या रक्षणासाठी आपल्या पद्धतीने पावले उचलावी लागतील. त्याचसमवेत ओवैसी यांच्या सभेसही अनुमती नाकारावी, असे निवेदन बजरंग दलाच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सोळशे यांना देण्यात आले. या वेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी मुतगेकर उपस्थित होते. निवेदन देतांना बजरंग दलाचे सर्वश्री मंदार पाचुकले, राहुल कडणे, अभिषेक पारनाईक, गौतम पाटील, दळवी, हिंदु जनजागृती समितीचे डॉ. उमेश लंबे उपस्थित होते. कुरुंदवाड येथे पोलीस उपनिरीक्षक प्रेमकुमार केदार यांना निवेदन देण्यात आले. या वेळी वरील सर्वांसमवेत हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री सुनील साळुंखे आणि अलोक आलासे उपस्थित होते.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.