नवी देहली - सर्वोच्च न्यायालय पुढील आठवड्यात अयोध्येतील राममंदिराच्या प्रकरणी भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांच्या याचिकेवर सुनावणी करणार आहे. न्यायालयाला डॉ. स्वामी यांची सूत्रे ऐकायची असल्याने ही सुनावणी करण्यात येणार आहे. सरन्यायाधीश टी.एस्. ठाकूर आणि न्यायमूर्ती अनिल दवे यांच्या खंडपिठासमोर डॉ. स्वामी यांनी शीघ्र आणि प्रतिदिन सुनावणीसाठी विनंती केल्यानंतर न्यायालयाने सुनावणीचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण साडेपाच वर्षांपासून प्रलंबित असल्याने या याचिकेवर प्रतिदिन सुनावणी व्हावी, असे डॉ. स्वामी यांनी सांगितले होते. डॉ. स्वामी यांनी अयोध्येत पाडलेल्या बाबरी मशिदीच्या जागी राममंदिर बांधण्याची अनुमती मागितली होती; तसेच त्यांनी रामजन्मभूमीविषयी अलाहाबाद उच्च न्यायालयाने ३ न्यायाधिशांच्या खंडपिठाने ३० सप्टेंबर २०१० या दिवशी दिलेल्या निर्णयाला आव्हान देणार्या अनेक याचिकांवरही शीघ्र सुनावणी करण्याचा आदेश देण्याची विनंती केली होती.Saturday, November 19, 2016
अयोध्येतील राममंदिराचे प्रकरण - पुढील आठवड्यात डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार !
Posted by vidarbha on 11:30:00 PM in नवी देहली | Comments : 0
नवी देहली - सर्वोच्च न्यायालय पुढील आठवड्यात अयोध्येतील राममंदिराच्या प्रकरणी भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांच्या याचिकेवर सुनावणी करणार आहे. न्यायालयाला डॉ. स्वामी यांची सूत्रे ऐकायची असल्याने ही सुनावणी करण्यात येणार आहे. सरन्यायाधीश टी.एस्. ठाकूर आणि न्यायमूर्ती अनिल दवे यांच्या खंडपिठासमोर डॉ. स्वामी यांनी शीघ्र आणि प्रतिदिन सुनावणीसाठी विनंती केल्यानंतर न्यायालयाने सुनावणीचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण साडेपाच वर्षांपासून प्रलंबित असल्याने या याचिकेवर प्रतिदिन सुनावणी व्हावी, असे डॉ. स्वामी यांनी सांगितले होते. डॉ. स्वामी यांनी अयोध्येत पाडलेल्या बाबरी मशिदीच्या जागी राममंदिर बांधण्याची अनुमती मागितली होती; तसेच त्यांनी रामजन्मभूमीविषयी अलाहाबाद उच्च न्यायालयाने ३ न्यायाधिशांच्या खंडपिठाने ३० सप्टेंबर २०१० या दिवशी दिलेल्या निर्णयाला आव्हान देणार्या अनेक याचिकांवरही शीघ्र सुनावणी करण्याचा आदेश देण्याची विनंती केली होती.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment