BREAKING NEWS

Saturday, November 19, 2016

हिंदु धर्मजागृती सभेला शिवसेनेकडून सर्वतोपरी साहाय्य केले जाईल ! - राजेश क्षीरसागर, आमदार, शिवसेना

आमदार श्री. राजेश क्षीरसागर (उजवीकडे)
यांना हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण देतांना धर्माभिमानी

       कोल्हापूर - येथील पद्माराजे गर्ल्स हायस्कूल येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ११ डिसेंबर या दिवशी भव्य हिंदु धर्मजागृती सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेचे निमंत्रण येथील शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांना समितीच्या कार्यकर्त्यांनी दिले. या वेळी सभेचा प्रचार करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने होर्डिंग्ज लावले जाईल आणि शिवसैनिकही सभेत सहभागी होतील. सभेसाठी शिवसेनेकडून सर्वतोपरी साहाय्य केले जाईल, असे आश्‍वासन त्यांनी कार्यकर्त्यांना दिले. समितीच्या शिष्टमंडळाने १८ नोव्हेंबर या दिवशी श्री. क्षीरसागर यांच्या निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेतली. त्याप्रसंगी ते बोलत होते. समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक सर्वश्री सुनील घनवट, कोल्हापूर जिल्हा समन्वयक किरण दुसे, मधुकर नाझरे आदी या वेळी उपस्थित होते.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.