BREAKING NEWS

Tuesday, November 15, 2016

चार रेती ट्रक चालकांना २ लाख ४४ हजार रूपयांचा दंड


अवैध रेती वाहतुक करणे भोवले
चांदूर रेल्वे तहसीलदार राजगडकर यांची कारवाई


चांदूर रेल्वेः/शहेजाद खान /--


अवैधरित्या क्षमतेपेक्षा जास्त रेती वाहतुक करणार्‍या ४ रेती ट्रक चालकांवर चांदूर रेल्वे तहसीलदार बि.ए.राजगडकर यांनी दंडात्मक कारवाई केली.क्षमतेपेक्षा जास्त रेती वाहतूकीचे त्यांना २ लाख ४४ हजाराचा दंड ठोठावण्यात आला. या कारवाईमुळे अवैध रेती वाहतूक करणार्‍या व्यवसायीकांना चांगली धडकी बसली आहे.
सविस्तर वृत्त असे की, चांदूर रेल्वे तालुक्यातील सर्व रेती घाटासह वर्धा रेती घाटाचे हर्रास व्हायचं आहे. त्यामुळे रेती वाहतुकदारांनी आपला मोर्चा यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा नदी घाटाकडे वळविला. बाभुळगाव तालुक्यातील नागरगाव, हिवरा येथील रेती घाटावरून क्षमतेपेक्षा जास्त रेती वाहुन आणणे सुरू केले. चांदूर रेल्वे तहसीलदार बि.ए.राजगडकर यांनी क्षमतेपेक्षा जास्त रेतीची वाहतुक करणार्‍यांवर धडक कारवाई सुरू केली. आज दिवसभर्‍यात धनोडी, मांजरखेड व चांदूर रेल्वे क्रॉसिंगजवळ असे एकूण चार रेतीचे ट्रक पकडले.त्यामध्ये २ ब्रॉस पेक्षा जास्त रेती आढळली. यामध्ये एमएच ३१/सिबी-१६४, एमएच०४/डिडी-१४९५ व एमएचजी-४७६६, एमएच१२/एफझेड-७०५० यांच्यावर प्रत्येकी ६१ हजार प्रमाणे कारवाई करून त्यांच्याकडुन एकुण २ लाख ४४ हजार रूपयांचा दंड वसुल करण्यात आला. या कारवाईत मंडळ अधिकारी दिलीप इंगळे, विलास वाढोणकर, तलाठी योगेश वंजारी, मुकुंद  सुडके, राजेश मलमकर, अरविंद सराड, निलेश लांजेवार, नितीन धोटे, कोतवाल रामेश्वर पवार यांनी मोलाची भुमिका बजावली.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.