BREAKING NEWS

Sunday, November 27, 2016

सनातनच्या ग्रंथांची माहिती रायचूर (कर्नाटक) जिल्ह्यातील सर्व शाळांच्या प्रमुखांपर्यंत पोचवणार ! - शिक्षण उपसंचालक, कर्नाटक

  रायचूर (कर्नाटक) - 
Image result for सनातनच्या ग्रंथांची माहिती

येथील हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक बी. रमेश यांच्या नेतृत्वाखाली समितीच्या कार्यकर्त्यांनी मनवीनगरच्या सार्वजनिक शिक्षण क्षेत्राचे उपसंचालक श्री. रमंजीनेय्या यांची भेट घेऊन त्यांना सनातनच्या ग्रंथांची माहिती दिली. यावर ते म्हणाले, हे ग्रंथ खूप उपयुक्त आहेत. याविषयी शाळांतील विद्यार्थ्यांना माहिती दिल्यास ते पुढे आदर्श व्यक्ती होऊ शकतात. या ग्रंथांची माहिती मी रायचूर जिल्ह्यातील सर्व शाळाप्रमुखांपर्यंत पोचवणार, असे आश्‍वासनही त्यांनी यावेळी दिले. या वेळी मनवीनगरचे अधिकारी श्री. रीवन सिद्धय्या उपस्थित होते. श्री. सिद्धय्या म्हणाले, सनातनचे ग्रंथ सर्व शाळांमध्ये पोचणे आवश्यक आहे. हे ग्रंथ आम्हाला मिळतात हे आमचे भाग्य आहे. ग्रंथांच्या माध्यमातून सनातन संस्था श्रेष्ठ कार्य करत आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.